महायुतीत बिब्बा घालणाऱ्यांचा भाजपनं बंदोबस्त करावा- उद्धव
`महायुती अभेद्य असून भाजप अन्य कोणत्याही मार्गानं जाणार नसल्याचं नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांनी शिवसेनेला आश्वस्त केलंय. त्यामुळं इतरांनी त्यावर बोलण्याची गरज नाही,` असं सांगत, `महायुतीत बिब्बा घालणाऱ्यांचा बंदोबस्त भाजपनं करावा,` असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठणकावलंय.
Mar 13, 2014, 03:36 PM ISTसेनेच्या नार्वेकरांची माघार, विधान परिषद बिनविरोध
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी माघार घेतल्यामुळं निवडणुकीच्या रिंगणात ९ उमेदवार राहिल्यानं निवडणूक बिनविरोध झाली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त झाल्या होत्या. मात्र यासाठी १० जणांचे अर्ज आल्यामुळं निवडणूक होणार होती. आता राहुल नार्वेकर यांनी माघार घेतल्यामुळं निवडणून बिनविरोध झाली असून घोडबाजारालाही चाप बसला आहे.
Mar 13, 2014, 02:45 PM ISTकमळाबाईंसाठी सेनेचं `टेंगूळ आख्यान`, गडकरींवर टीकास्त्र
सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर टीका केलीय. `टेंगूळ आख्यान` या मथळ्याखाली आलेल्या अग्रलेखात भाजप-मनसे जवळीकीवर टीकास्त्र सोडलंय. दुश्मनांचे डोके फोडण्याऐवजी भाजप सध्या स्वतःच्या डोक्यात काठी मारुन टेंगूळ आणत असल्याची टीका यात करण्यात आलीय.
Mar 13, 2014, 11:43 AM ISTउद्धव ठाकरेंची समजूत काढण्यासाठी काय काय?
भाजप नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या `चोरी चोरी चुपके चुपके` भेटीगाठी घेतल्यानं शिवसेना-भाजप युतीचा संसार मोडण्याची चिन्हं होती. मात्र भाजपच्या नेतृत्वानं धावाधाव करून तूर्तास तरी शिवसेना पक्षप्रमुखांची समजूत काढलेली दिसतेय.
Mar 11, 2014, 08:00 PM ISTमावळमधून सेनेतर्फे श्रीरंग बारणे, बाबरांचा पत्ता कापला
मावळमधून शिवसेनेनं श्रीरंग बारणे यांना लाकसभेची उमेदवारी दिली आहे. मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत बारणेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.
Mar 11, 2014, 07:36 PM ISTगजानन बाबर यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांनी अखेर जय महाराष्ट्र केला आहे. ते नाराज असल्याने सेनेला रामराम केलाय. बाबर हे मनसेच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
Mar 11, 2014, 05:09 PM ISTउद्धव ठाकरेंची गडकरी आणि मनसेवर टीका
महाराष्ट्रात भाजपमध्ये नेमके अधिकार कुणाला, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. शिवसेना-भाजप युतीमध्ये सगळं गुण्यागोविंदानं सुरू असताना बिब्बा टाकला जातो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गडकरींचं नाव न घेता टीका केलीय.
Mar 11, 2014, 04:49 PM ISTशिवसेनेच्या बैठकीचं रामदास कदमांना आमंत्रणच नाही
शिवसेनेच्या पदाधिका-यांची आज महत्त्वपूर्ण बैठक होतेय. मात्र या बैठकीला रामदास कदम यांना निमंत्रणच नाहीय.
Mar 11, 2014, 01:10 PM ISTसेनेला अभिजीत पानसे यांचा जय महाराष्ट्र
शिवसेनेचा आणखी एक मोहरा गळला आहे. अभिजीत पानसे यांनी सेनेला जय महाराष्ट्र केलाय. पानसे उद्या मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात जाहीर प्रवेश करणार आहे.
Mar 8, 2014, 02:33 PM ISTशिवसेना-भाजपमधील दरी रुंदावतेय
विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेनं दोन उमेदवार उभे केल्यानं भाजपामध्ये प्रचंड नाराजी आहे. शिवसेना-भाजपा युतीचं विधानसभेतलं संख्याबळ पाहता तीन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. मात्र शिवसेनेनं आधीच निलम गोऱ्हे आणि राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. तर भाजपही दोन उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
Mar 8, 2014, 12:25 PM ISTसामनातील टीकेला गडकरींचं उत्तर
राज ठाकरे यांची भेट घेतल्याप्रकरणी शिवसेनेनं सामना मुखपत्रात केलेल्या टीकेला भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी उत्तर दिलंय.
Mar 6, 2014, 04:39 PM IST‘सामना’मधून गडकरींवर जबरी टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीवरून शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनामधून नितीन गडकरींवर टीका केलीय...
Mar 5, 2014, 05:18 PM ISTराज-गडकरी स्वस्त व मस्त सौदा - शिवसेना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीवरून शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनामधून नितीन गडकरींवर टीका केलीय.
Mar 5, 2014, 09:49 AM ISTराज ठाकरे मराठी माणसासाठी निर्णय घेतील - बाळा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुणालाही भेटायला बोलावलेलं नसल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलंय... महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचा निर्णय राज ठाकरे लवकरच घेतील असंही त्यांनी सांगितलंय...
Mar 4, 2014, 08:18 PM ISTगडकरींचा प्रस्ताव राज ठाकरेंना अमान्य
भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिलेला प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमान्य केलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळं आता मनसे आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याची शक्यता आहे.
Mar 4, 2014, 08:06 PM IST