Akshay Kumar Sold His Apartment: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार गेल्या 34 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये आहे. अभिनेत्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ज्याद्वारे त्यांने चाहत्यांच्या ह्रदयावर राज्य केलं आहे. त्यासोबतच त्याला या काळात प्रचंड प्रसिद्धी देखील मिळाली. अलीकडेच अभिनेता अक्षय कुमारने ओबेरॉय स्काय सिटी, बोरिवली पूर्व, मुंबई येथील त्याचे अपार्टमेंट विकले आहे.
रिअल इस्टेट कंपनी Square Yards च्या म्हणण्यानुसार, अक्षय कुमारने नोव्हेंबर 2017 मध्ये हे अपार्टमेंट 2.38 कोटी रुपयांना खरेदी केले होते. आता त्याची किंमत 78% ने वाढली आहे. अभिनेत्याचे हे अपार्टमेंट 1073 स्क्केअर फूट आहे. यामध्ये दोन कार पार्किंग सुविधा आहे. विक्रीदरम्यान या अपार्टमेंट 25.5 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30000 हजार रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले. अक्षय कुमारने हा फ्लॅट 4.25 कोटी रुपयांना विकला. जो ओबेरॉय रियल्टीने बांधला आहे. जो 25 एकरमध्ये पसरलेला आहे. यामध्ये अनेक मोठ्या कलाकारांचे फ्लॉट आहेत. IGR मालमत्ता नोंदणीच्या नोंदीनुसार, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांसारख्या कलाकारांची या ठिकाणी मालमत्ता आहे.
अक्षय-ट्विंकल जुहू येथील आलिशान घरात राहतात
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची ट्विंकल खन्ना आणि मुलांसोबत मुंबईतील जुहू येथे समुद्राभिमुख असलेल्या डुप्लेक्समध्ये राहतात. या आलिशान घराची किंमत 80 कोटींहून अधिक आहे. घरामध्ये वॉक-इन क्लोजेट, होम थिएटर आणि एक सुंदर बाग यासारख्या सर्व आधुनिक सुविधा त्याच्या डुप्लेक्समध्ये आहेत. त्याच्या घरातून समुद्राचे विहंगम दृश्य देखील पाहायला मिळते.
अक्षय कुमारच्या नावावर आहेत अनेक रेकॉर्ड
अक्षय कुमार नेटवर्थ आणि चित्रपटांसोबतच त्याच्या जीवनशैलीने देखील सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. त्याच्या यशस्वी कारकीर्दीमुळे आणि गुंतवणुकीमुळे, तो बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. एवढेच नाही तर त्याच्या नावावर असे अनेक विक्रम देखील आहेत. जे आजपर्यंत कोणताही बॉलिवूड स्टार मोडू शकला नाही. अक्षय कुमारने 1991 मध्ये 'सौगंध' चित्रपट केला होता. त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.