ठाण्यात शिवसेना - काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

ठाणे महानगरपालिकेच्या परीवहन समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत. परीवहन निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आघाडीनं फोडलेल्या शिवसेनेच्या सदस्याचा अर्ज भरताना हा प्रकार घडलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 19, 2013, 07:44 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे महानगरपालिकेच्या परीवहन समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत. परीवहन निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आघाडीनं फोडलेल्या शिवसेनेच्या सदस्याचा अर्ज भरताना हा प्रकार घडलाय.
शिवसेनेचे परिवहन सदस्य शैलेश भगत आघाडीच्यावतीने अर्ज भरत होते. त्यावेळा त्यांना रोखण्यात आलं. अखेर पोलिसांना बोलावण्यात आलं. परीवहन समितीची निवडणूक २३ डिसेंबरला होणार आहे. दरम्यान शैलेश भगत यांनी पोलीस संरक्षणात आपला अर्ज दाखल केलाय. मात्र प्रत्यक्ष परिवहन समितीतल्या बलाबलामुळे आता सत्ता नेमकी कोणाकडे राहणार याबाबत संभ्रम वाढलाय. त्यामुळे शहरातली तणावाची स्थिती कायम आहे.
शैलेश भगत यांनी राष्ट्रवादीकडून परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी पालिका मुख्यालयासमोर हाणामारी झाली. राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. हा गोंधळ तब्बल अर्धातास पालिका मुख्यालय परिसरात सुरु होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
अखेर नौपाडा पोलीस घटनास्थळी आले आणि राज्य राखीव पोलीसही पालिका मुख्यालयात पोहचले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात भगत यांना प्रथम नौपाडा पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. त्यानंतर त्यांना पुन्हा मुख्यालयात आणल्यानंतर त्यांनी परिवहन सभापतीपदासाठी अर्ज भरला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ