राज्यसभेत लोकपालवर मतदान? शिवसेनेचा विरोध
संसदेच्या या अधिवेशनातच लोकपाल विधेयक संमत करावं, त्यासाठी गरज पडल्यास अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवावा लागला तरी वाढवावा असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलंय. आज अण्णांनी राळेगणसिद्धीमध्ये पत्रकार परिषद घेतली.
Dec 15, 2013, 08:29 PM ISTशिवसेनेच्या आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीला डिवचलं
पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वातावरण तापायला लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:ला ताकदवान म्हणतंय. पण त्यांच्याकडे माझ्या विरोधात साधा उमेदवारही नाही, अश्या शब्दात शिरूरचे खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीला डिवचलंय. तर राष्ट्रवादीनं ही शिरूर यावेळी आमचीच राहणार, असं सांगत राजकीय वातावरण तापवलंय.
Dec 14, 2013, 10:17 PM IST‘विक्रांत’ बचावासाठी शिवसेना, मनसेसोबत बाप्पाही आले!
ऐतिहासिक महत्त्व असलेली आयएनएस विक्रांत ही युद्धानौका वाचवण्यासाठी आता गणेश मंडळांनीही पुढाकार घेतलाय. मुंबईमध्ये १० हजारांहून जास्त सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. या मंडळानी प्रत्येकी १० हजार किंवा स्वेच्छेने त्याहून अधिक निधी दिला तर १० ते १५ कोटी जमा होतील, अशी माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्षा नरेश दहिबावकर यांनी दिलीय.
Dec 13, 2013, 09:05 PM ISTजादूटोणा विरोधी विधेयकाचा आग्रह धरणारे दलाल- दिवाकर रावते
जादूटोणा विरोधी विधेयकाचा आग्रह धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी `दलाल` अशी संभावना केलीय... संसदीय मार्गानं विधेयकाला विरोध करता करता रावतेंची जीभ घसरल्याचं दिसतंय.
Dec 10, 2013, 03:25 PM ISTनाराजी नाट्यानंतर अखेर जोशी सरांनी मागितली माफी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी १८० अंशात यू टर्न घेतलाय. मी चूक केली नाही, मी माफी मागणार नाही... असं याआधी सांगणाऱ्या मनोहर जोशींनी आता चक्क माफी मागितलीय.
Nov 29, 2013, 07:05 PM ISTमनसेला सुहास कांदेंचा रामराम, शिवसेनेत प्रवेश
नाशिकमधले मनसेचे माजी पदाधिकारी सुहास कांदे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय... मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केलाय... यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थितीत होते...
Nov 29, 2013, 01:49 PM IST...तर नाराजांनी पक्ष सोडून जावे – उद्धव ठाकरे
माझ्या नेतृत्वावर ज्यांचा विश्वास नसेल अशांनी पक्ष सो़डून जावे, असा असा सज्जड दम शिवसेनेतल्या नाराजांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भरला आहे.
Nov 29, 2013, 01:27 PM IST`दादा`गिरी करणाऱ्यांचे हात मुळासकट उखडून टाकू - उद्धव ठाकरे
माझ्या शिवसैनिकांच्या वाट्याला जाऊ नको. याचा चांगला परिणाम होणार नाही. येथे काँग्रेसची दादागिरी चालणार नाही. उगारणारा हात मुळासकट उखडून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्योग मंत्री नारायण राणे यांना दिला.
Nov 27, 2013, 08:17 AM ISTशिवसेनेत ज्येष्ठ नेत्यांना डावललं जातंय?
शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यापासून शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत असलेले एकेक मोहरे गळत असल्याचं चित्र निर्माण झालंय. आपल्याला डावललं जात असल्याची शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भावना होत असल्याचंच यामुळं स्पष्ट झालंय...
Nov 23, 2013, 08:19 AM ISTशिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांनी उरकलं उद्यानाचं उद्घाटन
पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना आणि मनसेनं आज अजित पवारांच्या हस्ते उदघाटन होणाऱ्या उद्यानाचं आधीच उदघाटन करून टाकलंय.
Nov 22, 2013, 12:36 PM ISTकाँग्रेसकडून शिवसेना टार्गेट, मनसेला झुकते माप?
काँग्रेस विरूद्ध नरेंद्र मोदी असे राजकीय रंग भरले असतानाच आता काँग्रेसने शिवसेनेला टार्गेट करण्याचं धोरण अबलंबिले दिसून येत आहे. शिवसेना टार्गेट करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे.
Nov 19, 2013, 01:29 PM ISTज्योतिष सांगण्याच्या बहाण्यानं तरुणीवर अत्याचार
भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं तरुणीवर अत्याचार करणाऱ्या जोतिष्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत केलीय. कोथरुड पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास उशीर केल्या कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोपही गोऱ्हे यांनी केला.
Nov 19, 2013, 11:48 AM ISTबाळासाहेबांच्या स्मृतिदिनाची जय्यत तयारी
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाची जय्यत तयारी सुरू आहे. शिवाजी पार्कातल्या स्मृतिउद्यानात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. देशभरातून लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर दर्शन घेणार आहेत.
Nov 16, 2013, 09:39 AM ISTराज आणि उद्धव यांचं अनोखं `बंधुप्रेम`!
राज-उद्धवमध्ये सीझ फायर ? ...
गेल्या काही महिन्यांत दोघांची एकमेकांवर टीका नाही...
निवडणुकीआधी काय शिजतंय शिवसेना- मनसेत ?...
सेना-मनसेत तयार होतोय "अंडरस्टँडिंग" फॉर्म्युला ?...
बाळासाहेब ठाकरेंच्या विविध पेन्टिंगसचं मुंबईत प्रदर्शन
शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध पेन्टिंगसचं प्रदर्शन नरीमन पॉईण्टमधल्या बजाज आर्ट गॅलरीत भरलं आहे. भारत टायगर या नव्या चित्रकारानं ही पेन्टिंगस साकारलीय आहेत.
Nov 6, 2013, 10:09 PM IST