मोदींच्या शपथविधीला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित!
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारताचे 15वे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तसंच शिवसेनेचे खासदार अनंत गिते हे नवाझ शरीफ यांच्यासमोरच मंत्रीपदाची शपथ घेतील, असेही संकेत मिळतायेत.
May 25, 2014, 07:58 PM ISTशरीफ दौऱ्याबाबत तोंडात मिठाची गुळणी का? शिवसेनेला सवाल
पाकिस्तानचं नाव निघताच नेहमी विरोध करणारी शिवसेना आता गप्प का? पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या भारत दौऱ्याबाबत शिवसेनेच्या तोंडात मिठाची गुळणी का?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.
May 24, 2014, 08:26 PM ISTशिवसेना नेते मोहन राऊत यांची गोळ्या झाडून हत्या
बदलापूर शिवसेनेचे उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांची शुक्रवारी सकाळी गोळ्या झाडून हत्या झालीय.
May 24, 2014, 02:39 PM ISTराज ठाकरेंच्या घरासमोर ‘चिटपाखरू’ नाही
निवडणुका म्हटलं की जिथे प्रचंड लगबग असायची..... कार्यकर्त्यांची गर्दी, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची व्हिज्युअल्स घेण्याची धडपड सुरू असायची..... कुणीही नेता त्या भागाच्या आसपास जरी फिरकला तरी ब्रेकिंग न्यूज व्हायची..... आता तिथं सारं काही शांत आहे..... आम्ही बोलतोय कृष्णकुंजबद्दल...... पाहुयात सध्या कृष्णकुंजवर काय सुरू आहे.....
May 20, 2014, 07:13 PM ISTसंसदेत पहिल्यांदा घुमला ठाकरे घराण्याचा आवाज
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक शिवसैनिकांना संसदेत पाठवले, शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा आवाज त्यांनी संसदेत घुमविला. पण लोकशाहीच्या मंदिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण करून पहिल्यांदा ठाकरे घराण्याचा आवाज संसदेच्या वास्तुत घुमविला.
May 20, 2014, 03:54 PM ISTयुतीला राज ठाकरेंची मदत, मनसेची मतं युतीच्या पारड्यात
लोकसभा निवडणूक 2014 अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरतेय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं मारलेली मुसंडी तर आहेच. सोबतच गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला भरभरून मतदान करणाऱ्या मतदारांनी यावेळी मनसेला केवळ नाकारलंच नाही तर आपली मतं शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना दिल्याचं मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसत आहे.
May 19, 2014, 12:34 PM ISTनऊ वर्षांनंतर अरविंद भोसले पायात घालणार चप्पल
सिंधुदुर्गात राणेंचा पराभव होईपर्यंत अनवाणी फिरण्याची प्रतिज्ञा करणारे कट्टर शिवसैनिक अरविंद भोसले हे आता लवकरच पायात चप्पल घालणार आहेत.
May 18, 2014, 09:47 AM ISTअनंत गितेंची शिवसेनेच्या संसदीय गटनेतेपदी निवड
राज्यात महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मातोश्रीवर चांगलीच लगबग होती. हा विजय साजरा करण्यासाठी मातोश्री सजली. सकाळपासूनच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती.
May 18, 2014, 09:09 AM ISTज्यांनी शिवसेना सोडली, त्यांना जनतेनं सोडलं!
लोकसभा निवडणूक 2016चे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यालयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांमधला उत्साह तर खूप वाढलेला दिसतोय. कारण ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना यंदा मतदारांनी सोडलंय.
May 16, 2014, 06:52 PM ISTलोकसभा निकाल : पाहा, ४८ मतदारसंघांचा निकाल
राज्यातील 48 जागांपैकी 22 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर शिवसेना 19, राष्ट्रवादी 5 तर काँग्रेस अवघ्या 1 जागेवर आघाडीवर आहे.
May 16, 2014, 11:00 AM ISTराहुल परदेशी, सुट्ट्यांमध्ये येतात भारतात- संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे उपाध्याक्ष राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंगाच्या फेअरवेल पार्टीत राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत "राहुल गांधी हे परदेशी आहेत जे फक्त सुट्ट्यांमध्ये भारतात येतात", असं म्हटलंय.
May 15, 2014, 12:19 PM ISTमराठी - गुजराती वादात आता मनसेची उडी
मराठी - गुजराती वादात आता मनसेची उडी घेतली आहे. गुजरातमधील संदेश या वृत्तपत्राची वादग्रस्त जाहिरीती बेस्टवरून हटविण्याची मागणी मनसेनेने केली आहे. गुजरात विरोधात भूमिका सामनामधून मांडण्यात आली होती. त्यामुळे गुजरात वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.
May 9, 2014, 04:03 PM ISTकल्याण-डोंबिवली पालिकेत स्थायी समिती शिवसेनेकडे
कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समितीसाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे दीपेश म्हात्रे विजयी झालेत. दरम्यान, मनसेच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत घोडेबाजाराला ऊत आला होता. फोडाफोडी करूनही मनसेला पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत राष्ट्रवादी तटस्थ राहिल्याने सेनेला फायदा झाला.
Apr 29, 2014, 12:37 PM ISTशिवसेना नेते रामदास कदमांविरोधात FIR
सभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेते रामदास कदम यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांनी हा गुन्हा नोंदविला आहे.
Apr 23, 2014, 06:01 PM ISTउत्तरभारतीयांना पुन्हा मारीन - राज ठाकरे
उत्तर भारतीय माझ्या मराठी मुलांच्या तोंडातील घास हिसकवून घेत असतील तर पुन्हा मारीन असे सज्ज दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज लालबाग येथील मेघवाडी सभेत दिला.
Apr 21, 2014, 09:49 PM IST