www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
आदर्श प्रकरणी राज्य सरकारनं पुनर्विचार करावा, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.
पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा ‘मिस्टर क्लीन’ अशी होती. मात्र त्यांनी भ्रष्टाचारावर पांघरून घालून खतपाणी घालण्याचं काम केल्यानं राजीनामा नव्हे तर सरकार बरखास्त करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय. राहुल गांधी यांनी आधी पंतप्रधान यांचे कान उपटले आता मुख्यमंत्र्यांचे कान उपटले. त्यामुळं सरकार कोण चालवतंय हेच कळेनास झाल्याची टीकाही उद्धव यांनी केली.
आदर्श अहवाल नाकारणं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असं जर अजित पवार सांगतायत मात्र ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा दाबला गेला त्याच काय? असा सवाल करत मंत्रिमंडळात कोणीच स्वच्छ प्रतिमेचं राहिलं नसल्यानं सरकार बरखास्त करून निवडणुकांना सामोरं जाण्याशिवाय पर्याय नसल्याचं मत ठाकरे यांनी व्यक्त केलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक उद्धव यांच्या उपस्थित नाशिकमध्ये झाली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.