shiv sena

बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबरला पहिला स्मृतीदिन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा येत्या १७ नोव्हेंबरला पहिला स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक तसेच व्हीआयपी शिवाजी पार्कवर येणार आहेत.

Nov 6, 2013, 08:09 PM IST

आठवलेंना `मातोश्री`वर दिवाळी गिफ्ट?

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिवाळी गिफ्ट मिळाल्याचं सांगितलंय. आपल्या राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती आठवलेंनी या भेटीनंतर दिली.

Nov 3, 2013, 10:33 PM IST

दिवाळी उत्सव : सीमारेषेवर देणाऱ्या सैनिकांचा सत्कार

देशभरात दिवाळीचा सण साजरी होत असताना सीमारेषेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देणा-या सैनिकांच्या मात्यापित्यांचा सत्कार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शिवसेनेतर्फे करण्यात आला.

Nov 2, 2013, 10:56 AM IST

`मौलाना` ही उपाधी चालते का?- राऊत

“देशात अनेक शासकीय संस्थांना मुस्लिम नेत्यांची नावं आहेत आणि त्यात असलेली मौलाना ही उपाधी कशी चालते?” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय.

Oct 26, 2013, 03:49 PM IST

मनोहर जोशी...विषयावर बोलण्याची ही वेळ नव्हे - उद्धव

मनोहर जोशींच्या पत्रावर बोलण्याची गरज नाही, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगून जोशींच्या नाराजीवर उद्धव यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

Oct 19, 2013, 08:19 AM IST

शिवसेनेत धुसफूस सुरू, मेळावा पोस्टरवरून रामदास कदम गायब

गुहागर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. इथं शिवसेना नेते रामदास कदम आणि खासदार अनंत गीते समर्थकांमध्ये धुसफूस सुरु आहे.

Oct 18, 2013, 01:39 PM IST

अजित पवारांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

कालच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. योग्य वेळी प्रत्युत्तर देऊ असं उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अजित पवार म्हणाले आहेत.

Oct 14, 2013, 02:55 PM IST

`शरद पवार म्हणजे थकलेला नवरा सगळीकडे बाशिंग!`

शिवसेनेच्या ४८ व्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात आक्रमकपणे शरद पवार, मुख्यमंत्री तसंच पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना टिकेचं लक्ष्य केलं.

Oct 13, 2013, 09:12 PM IST

नागरिकांची इच्छा तरच क्रीडा संकुल उभे राहील- राज

नरे पार्कवर क्रीडा संकुल व्हावं ही जर नागरिकांची इच्छा असेल, तरच इथे वास्तू उभी राहील असं राज यावेळी म्हणाले.

Oct 13, 2013, 03:07 PM IST

शिवसेनेत फायलीन वादळ, रामदास कदमांचा जोशींवर हल्लाबोल

शिवसेना नेते रामदास कदम यांनी मनोहर जोशींवर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या वादाला मनोहर जोशी जबाबदार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. जोशी सरांच्या टीकेमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोपही रामदास कदमांनी केला आहे.

Oct 12, 2013, 03:00 PM IST

शिवसेना दसरा मेळाव्याला कशी मिळाली परवानगी?

गेली ४७ वर्षे शिवसेनेच्या दसरा होत आहे. या मेळाव्याला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे सेनेने कोर्टात धाव घेतली. या मेळाव्यात शेरेबाजीवर निर्बंध टाकत न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दसऱ्याचा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होणार आहे.

Oct 9, 2013, 07:55 AM IST

शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?... शिवसेनेचा!

आवाज कुणाचा... शिवसेनेचा... ही घोषणा पुन्हा एकदा शिवाजी पार्कच्या सायलेन्स झोनमध्ये घुमणार आहे. कारण शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई हायकोर्टाने परवानगी दिलीय..

Oct 8, 2013, 06:37 PM IST

ठाणे पालिका स्थायी समिती निवडणुकीत चुरस, आघाडीत बिघाडी

ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. महायुती आणि आघाडीकडे प्रत्येकी आठ सदस्य असल्यामुळे पुन्हा चिठ्ठी टाकून मतदान होणार होतं. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. तर युतीमध्येही फूट पडलीये.

Oct 8, 2013, 07:24 AM IST

घाडी, चौगुलेंचा सेनेला जय महाराष्ट्र, मनसे परतणार

शिवसेनेचे उपनेते संजय घाडी आणि राजा चौघुले हे पुन्हा एकदा मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत... शिवसेनेमध्ये सन्मान न मिळाल्याने नाराज असलेल्या या दोघांनी आज कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

Oct 7, 2013, 01:10 PM IST

मनसे आंदोलनाला परवानगी नाकारली, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. विना परवानगी आंदोलन केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला.

Oct 4, 2013, 02:25 PM IST