अजित दादांचं मुंडेंना प्रत्युत्तर, ठाकरे बंधूंना सल्ला!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडेंच्या टीकेचा समाचार घेतला. `त्यांना पुतण्या सांभाळता आला नाही` त्याला आम्ही काय करणार असंही ते म्हणाले. तर दुसरीकडे "घरातले वाद घरात मिटवा तुमच्या वडे आणि चिकन-सुपनं देशाचे प्रश्न सुटणार नाहीत", असा खोचक सल्लाही अजित पवारांनी राज आणि उद्धव यांना दिलाय.
Apr 20, 2014, 06:04 PM ISTशरद पवार - राज ठाकरेंबाबत मनोहर जोशींचा बॉम्बगोळा
२००९च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शिवसेनेसोबत युती करायची होती, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलाय.
Apr 19, 2014, 07:39 PM ISTदक्षिण मध्य मुंबई - तिरंगी लढतीतील जातीय समीकरणं
दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेस, शिवसेना आणि मनसेमध्ये तिरंगी लढत होतंय. विविध जाती-धर्मातील लोक इथं राहत असल्यानं निवडणुकीत जातीय समीकरणांना अधिक महत्त्व आलंय.
Apr 18, 2014, 09:39 AM ISTमाजी खासदार `रावले` पुन्हा शिवसेनेकडे `धावले`
शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले हे पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेनेने तिकीट न दिल्यानंतर मोहन रावले राष्ट्रवादीत गेले होते, पण ते आज परतल्याचं मोहन रावले गिरगावातील जाहीर सभेत सांगितलं.
Apr 15, 2014, 08:45 PM ISTशिवसेनेसाठी रश्मी ठाकरे प्रचाराच्या आखाड्यात
महायुतीचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.
Apr 11, 2014, 10:30 PM ISTसेनेच्या बटनाला शॉक लागेल, राणेंचा अजब प्रचार
दोनदा मतदान करा, असा अजब सल्ला देणा-या केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याबद्दलचा वाद शमत नाही तो नारायण राणेंनीही नवीन वादाला तोंड फोडलंय. महायुतीच्या धनुष्यबाणावर मत देण्यास मतदान यंत्राचं बटण दाबाल तर शॉक लागेल, असं राणे म्हणालेत.
Apr 7, 2014, 03:55 PM ISTराज ठाकरे - मोदींवर प्रेम, उद्धवशी दुरावा नवीन समीकरण
आपला चुलत भाऊ उद्धव ठाकरे याच्याशी मतभेद झाल्यानंतर २००७मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या राजकीय पक्षाची स्थापना राज ठाकरे यांनी केली. जरी हा पक्ष स्थापन केला तरी चुलते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो.
Apr 4, 2014, 07:04 PM ISTउद्धव ठाकरे - बाळासाहेबानंतर दुसरा वाघ
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेची लोकसभा पहिलीच निवडणूक होत आहे. मात्र, असे असले तरी शिवसेनेची लोकप्रियता काही प्रमाणात कमी झाली आहे.
Apr 4, 2014, 06:49 PM ISTराणे-शिवसेनेत जुंपली, ...तर विष खाईन - रामदास कदम
नारायण राणेंनी शिवसेना सोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली होती, असा रामदास कदम यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. एकवेळ विष खाऊन मरेन, पण शिवसेना सोडणार नाही, असं कदमांनी राणे यांना ठणकावलं.
Mar 27, 2014, 09:06 AM ISTयोगेश घोलप बंडखोरी करणार? उमेदवारी अर्ज दाखल
शिर्डीमध्ये बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिक्षा झालेले बबनराव घोलप यांचे पूत्र योगेश घोलप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ते बंडखोरी करण्याची शक्यताय. तर शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय.
Mar 26, 2014, 03:58 PM ISTलोकसभा निवडणूक : कोणी भरलेत अर्ज, भाजपमध्ये गोंधळ
विदर्भात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान १० एप्रिलला होतंय. यांत विदर्भातल्या मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Mar 22, 2014, 08:48 PM ISTउद्धव ठाकरे बरसले; पवार, राज यांच्यावर हल्लाबोल
शिवसेना हा ओरिजिनल म्हणजेच नवनिर्मित पक्ष आहे. तर राष्ट्रवादी हा विकाऊ आणि गद्दारांचा पक्ष आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कुठे काय मिळते काय, यावर त्यांचा डोळा असतो, अशी जोरदार टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई येथे केली. याचवेऴी शिवसेना-भाजप युती सर्व जागा जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त केला.
Mar 22, 2014, 03:51 PM ISTशिवसेना विरोधात यवतमाळ-वाशिमधून मनसेतर्फे उमेदवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. हे सर्व उमेदवार शिवसेनेला जोरदार टक्कर देणार आहेत. यवतमाळ-वाशिमधून मनसेतर्फे उमेदवार देण्यात आलाय. शिवसेनेने आधीच भावना गवळी यांना उमेदवारी दिलेय. त्यामुळे शिवसेना-मनसे सामना पाहायला मिळणार आहे.
Mar 21, 2014, 09:05 PM ISTबबनराव घोलप : त्यांचे प्रकरण आणि काय आहेत आरोप?
शिर्डीतील शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार बबनराव घोलप अडचणीत आलेत. मुंबईतील माझगाव कोर्टानं त्यांना ३ वर्ष सश्रम कारावास आणि १ लाख दंडाची शिक्षा सुनावली गेली आहे. त्यांच्यावर नेमके काय आहेत आरोप आणि काय आहे हे प्रकरण, यावर एक नजर.
Mar 21, 2014, 03:55 PM ISTशेकाप आक्रमक, सेनेचा घरोबा तोडून विरोधात उमेदवार
शेतकरी कामगार पक्षानं शिवसेनेबरोबरचा घरोबा तोडलाय. गेल्या काही निवडणुकांमधली एकमेंकांबरोबरची सहकार्याची भूमिका सोडून शेकापनं शिवसेनेच्या विरोधात उमेदवार जाहीर केलेत.
Mar 14, 2014, 08:01 PM IST