shiv sena

शिवसेनेचा टीकेचा बाण ‘पोश्टर मॅन’च्या दिशेने

निवडणूक जवळ येतेय, आणि प्रत्येक मतदार संघात पोश्टर मॅन झळकताय, हे प्रमाण सर्वच पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसून येतंय.मात्र मनसे आमदार नितिन सरदेसाई यांनी दादर-माहिम भागात ‘आपलं माणूस’ असे पोस्टर्स लावल्यानंतर, शिवसेनेने त्यांना टोला लगावला आहे. जनतेमध्ये कधीही न दिसणारे नेते फक्त पोस्टर्सवरच दिसतात. तसंच दादर माहिम भागातून शिवसेनाच विजयी होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना विभागप्रमुख सदा सरवणकर यांनी दिली आहे.

Sep 14, 2014, 06:46 PM IST

चिरंतन पुरातन युतीत आता 'अबोला'

महायुतीत धुसफूस असल्याचं आता आणखी समोर येतंय. कारण भाजपने आता जागावाटपावर शिवसेनेशी बोलणी बंद केली आहे. भाजप प्रवक्त माधव भांडारी यांनी ही माहिती दिली आहे. 

Sep 14, 2014, 05:13 PM IST

महायुतीतील नेत्यांनी जास्त जागांची हाव धरु नये - शिवसेना

 शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनानं महायुतीतील पक्षांना जागांची जास्त हाव न धरण्याचा इशारा दिलाय. महायुतीतील सर्वच पक्षांनी महायुतीचे राज्य आधी आणावे जागांची हाव न करता ज्याची जेथे ताकद आहे तेथे त्याने लढावे व जेथे कमी जोर आहे तेथे आग्रह न धरता दोन पावले मागे यावे असा इशारा सामनानं अग्रलेखात दिलाय.

Sep 13, 2014, 05:51 PM IST

सेना भाजपला आठवलेंचे टोले

सेना भाजपला आठवलेंचे टोले

Sep 12, 2014, 11:21 AM IST

ठाणे महापौरपदी शिवसेनेचे संजय मोरे

ठाण्यात काँग्रेस नगरसेवकांनी पक्षाचा व्हिप धुडकावत काहींनी शिवसेनेला मदत केली. त्यामुळे शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार संजय मोरे यांना ही निवडणूक जिंकणे सहज शक्य झाले.

Sep 10, 2014, 01:28 PM IST

'लव्ह जिहाद'ला उत्तर देणार शिवसेनेचा 'लव्ह त्रिशूळ'!

'लव्ह जिहाद'ला उत्तर देण्यासाठी आता शिवसेना रणांगणात उतरलीय. आता, 'लव्ह जिहाद'ला 'लव्ह त्रिशूळ'मधून उत्तर देण्याचा बेत शिवसेनेनं आखलाय.

Sep 10, 2014, 01:21 PM IST

ऊठसूठ आंदोलनं करू नका, उद्धव ठाकरेंनी दिल्या कानपिचक्या!

केंद्रात मोठ्या कष्टानं आपलं सरकार आलं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर चर्चा करा. परंतु पहिल्या दिवसापासून आंदोलन करून वातावरण बिघडवू नका, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना कानपिचक्या दिल्या. 

Sep 10, 2014, 10:51 AM IST

शिवसेनेच्या स्नेहल आंबेकर मुंबईच्या महापौर

मुंबईच्या महापौरपद निवडणुकीत शिवसेनेच्या सौ. स्नेहल आंबेकर यांनी बाजी मारत मुबई शहराचा प्रथम नागरीक होण्याचा मान पटकावला. त्यांनी काँग्रेस उमेदवार सावंत यांचा ५७ मतांनी पराभव केला.

Sep 9, 2014, 02:25 PM IST