shiv sena

घटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर

घटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर

Sep 24, 2014, 11:42 PM IST

'महायुती'चा तिढा सुटला; घटकपक्षांचं 14 जागांवर समाधान

गेल्या कित्येक दिवसांपासून अडलेलं 'फॉर्म्युल्या'चं कोडं रात्री उशीरा का होईना पण सुटल्याची चिन्हं दिसू लागलीत. 

Sep 24, 2014, 10:34 AM IST

युतीबाबत पुन्हा बोलणी, सेना नेते भाजप नेत्यांची घेणार भेट

शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती जागा वाटपावरुन ताणली गेली होती. शिवसेना १५१ जागांवर तर भाजप १३० जागांवर ठाम असल्याने युतीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. मात्र, जागांच्या अदलाबदल होण्याच्या दृष्टीने विचार होऊ शकतो. त्यासाठी शिवसेना नेते भाजप नेत्यांची भेट घेणार आहे. त्यामुळे रुळावरून घसरलेली बोलणी पुन्हा ट्रकवर येत असल्याचे दिसत आहे.

Sep 23, 2014, 11:19 AM IST

हीच ती वेळ...हाच तो क्षण

 मला राजकारण माहित नाही, कळत नाही किंवा राजकारणात रस नाही असं म्हटलं तरी महायुतीत आज जे काही घडतंय ते पहाता, हे असं घडेल अशी सुतरामही शक्यता निदान माझ्या सारख्या पत्रकाराला

Sep 22, 2014, 08:29 PM IST

तुटलेल्या 'युती'चा इतिहास...

तुटलेल्या 'युती'चा इतिहास...

Sep 22, 2014, 04:36 PM IST

युती टिकविण्यासाठी अमित शहांचा फोन आलाच नाही - शिवसेना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी युती टिकविण्यासाठी फोन केल्याचे सांगण्यात आले. मात्र, शिवसेनेने या वृत्ताचा इन्कार केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव यांना असा कोणताही फोन आलाच नाही, असे म्हटले आहे.

Sep 22, 2014, 12:46 PM IST

शिवसेनेशी चर्चा नाही, भाजपचा अंतिम निर्णय - फडणवीस

आता यापुढे शिवसेनेशी चर्चा नाही, भाजपचा अंतिम निर्णय झालाय आहे. त्यामुळे सेनेशी चर्चा करणार नाही, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. त्यामुळे  २५ वर्षांची अभेद्य युती संपुष्टात आली आहे. केवळ घोषणा होण्याचे बाकी आहे.

Sep 22, 2014, 11:55 AM IST

युतीबाबत उद्धव ठाकरेंशी अमित शहांची फोनवर चर्चा

शिवसेना-भाजप युती तुटत असतांनाच  भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. शहा यांनी  उद्धव यांना युती टिकवण्याचं आवाहन केले आहे.

Sep 22, 2014, 11:29 AM IST

उद्धव यांची माथूर ऐवजी फडणवीस घेणार भेट

राज्यातील महायुतीतील गुंता अधिकच वाढला आहे. गेल्या २५ वर्षांतील युती तुटीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, भाजपचे निवडणूक प्रभारी ओम प्रकाश माथून हे आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र, यात बदल करण्यात आला असून प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस ठाकरे यांची भेट घेणार आहे.  परंतु शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. युतीवाचविण्यासाठी धडपड सुरू आहे.

Sep 22, 2014, 10:38 AM IST

दिल्ली तुमची, महाराष्ट्रात सत्ता आमचीच - शिवसेना

 शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातूनही शिवसेना-भाजप युतीच्या फुटीचे सूतोवाच करण्यात आलेत. दिल्ली तुमची, महाराष्ट्रात सत्ता आमचीच या मथळ्याखाली आलेल्या वृत्तात शिवसेनेकडून युती संपल्याचे सूतोवाच करण्यात आलेत.. 

Sep 22, 2014, 08:48 AM IST