ठाणे महापौरपदी शिवसेनेचे संजय मोरे

ठाण्यात काँग्रेस नगरसेवकांनी पक्षाचा व्हिप धुडकावत काहींनी शिवसेनेला मदत केली. त्यामुळे शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार संजय मोरे यांना ही निवडणूक जिंकणे सहज शक्य झाले.

Updated: Sep 10, 2014, 03:41 PM IST
ठाणे महापौरपदी शिवसेनेचे संजय मोरे title=

ठाणे : ठाण्यात काँग्रेस नगरसेवकांनी पक्षाचा व्हिप धुडकावत काहींनी शिवसेनेला मदत केली. त्यामुळे शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार संजय मोरे यांना ही निवडणूक जिंकणे सहज शक्य झाले.

ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या संजय मोरेंची निवड झाली आहे. संजय मोरे यांना एकूण ६६  मते पडली तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांना ४६ मते पडली. ठाणे उपमहापौरपदी राजेंद्र साप्ते यांची निवड झालीय. ठाण्यात महापौरपदाच्या निवडणुकीत मोरे यांनी आघाडीच्या विक्रांत चव्हाण यांचा २० मतांनी पराभव केलाय. काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी व्हीप धुडकावला. काँग्रेसचे चार नगरसेवक गैरहजर राहिले तर कांचन चिंदरकरांनी शिवसेनेचे उमेदवार मोरे यांना मत दिलं. मतदान केल्यानंतर चिंदरकर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामाही दिलाय. मनसे तटस्थ राहिली.

उद्योगमंत्री नारायण राणे समर्थक रवींद्र फाटक यांच्यासह काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे महापौर निवडणुकीची केवळ औपचारिकता शिल्लक राहीली होती. काँग्रेसचे चार नगरसेवक अनुपस्थित राहिलेत तर नगरसेविका कांचन चिंदरकर यांनी शिवसेनेला मतदान केले. संजय मोरे यांची या पदासाठी लॉटरी लागल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती. वागळे परिसरातून तीन वेळा निवडून आलेले मोरे हे आमदार एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या वरचष्म्यावर या निवडणुकीत दिसल्याचे बोलले जात आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.