रोहित, अय्यर, यशस्वी, रहाणे... सगळे दिग्गज फ्लॉप; लॉर्ड शार्दूल एकटा नडला, वाचवली मुंबईची लाज

Ranji Trophy 2025 : मुंबईचा संघ संकटात असताना शार्दूल ठाकूरने मैदानात अर्धशतक ठोकून मुंबईचा स्कोअर 100 पार पोहोचवला. 

पुजा पवार | Updated: Jan 23, 2025, 04:58 PM IST
रोहित, अय्यर, यशस्वी, रहाणे... सगळे दिग्गज  फ्लॉप; लॉर्ड शार्दूल एकटा नडला, वाचवली मुंबईची लाज  title=
(Photo Credit : Social Media)

Ranji Trophy 2025 : 23 फेब्रुवारीपासून रणजी ट्रॉफी सामन्यांना सुरुवात झाली आहे. देशभरातील विविध मैदानांवर रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy 2025) सामने खेळवले जात असून मुंबईच्या बीकेसी मैदानावर मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर (Mumbai VS Jammu Kashmir) यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना खेळवला गेला. मात्र यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील टीम इंडिया मोठा स्कोअर उभा करण्यात फ्लॉप ठरली आणि केवळ 120 धावाच करू शकली. रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, यशस्वी जयस्वाल असे टीम इंडियातील अनेक स्टार क्रिकेटर्स रणजी सामन्यात खेळण्यासाठी उतरले होते, मात्र हे सर्व संघासाठी मोठी खेळी करण्यात फ्लॉप ठरले. मुंबईचा संघ संकटात असताना शार्दूल ठाकूरने मैदानात अर्धशतक ठोकून मुंबईचा स्कोअर 100 पार पोहोचवला. 

रोहित - यशस्वीची जोडी ठरली सुपर फ्लॉप : 

 टीम इंडियाचा टेस्ट आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने जवळपास एका दशकानंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केलं. या सामन्याचा टॉस मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली. यावेळी मुंबईकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे दोघे सलामी फलंदाजीसाठी मैदानात उतरले. मात्र यशस्वी 4 धावा करून आकिब नबीच्या बॉलवर LBW बाद झाला तर रोहित शर्मा देखील केवळ 3 धावा करून गोलंदाज पारस डोगराच्या बॉलवर बाद झाला. तर कर्णधार अजिंक्य रहाणे 12, श्रेयस अय्यर 11, तनुष कोटियन 26 धावा करू शकले. 

लॉर्ड शार्दूलच्या खेळीने मुंबईला तारलं : 

दिग्गज फलंदाज एका मागोमाग एक फ्लॉप ठरत असताना 'लॉर्ड' नावाने प्रसिद्ध असलेला शार्दूल ठाकूरने मैदानात जम बसवला. 47 धावांवर मुंबईच्या 7 विकेट्स गेल्या असताना शार्दूल ठाकूरने 57  बॉलमध्ये 51 धावा केल्या, यात त्याने 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर शार्दूलला मैदानात तनुष कोटियनने देखील साथ दिली. तनुषने 36 बॉलमध्ये 26 धावा केल्या. शार्दूल आणि तनुषच्या खेळीमुळे मुंबईची धावसंख्या 120 वर पोहोचली. जम्मू काश्मीरकडून उमर नजीर मीर आणि युधवीर सिंगने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या तर औकिब नबीने 2 विकेट्स घेतल्या. 

हेही वाचा : IPL 2025 पूर्वी KKR ला मोठा धक्का! रणजी मॅचमध्ये स्टार खेळाडूला दुखापत, 23.75 कोटी पाण्यात?

मुंबईची प्लेइंग 11:

रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), मोहित अवस्थी, कर्ष कोठारी

जम्मू कश्मीरची प्लेइंग 11:

पारस डोगरा (कर्णधार), शुभम खजूरिया, कन्हैया वधावन (विकेटकीपर), आकिब नबी, विवरांत शर्मा, यावर हसन, अब्दुल समद, आबिद मुश्ताक, युद्धवीर सिंह, उमर नजीर मीर, वंशज शर्मा