shiv sena

महायुतीत धुसफूस : राजू शेट्टींच्या टीकेला शिवसेनेचे चोख उत्तर

शिवसेनेत इनकमिंग सुरूच आहे. त्यावर राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलेल्यांना शिवसेनेत का प्रवेश दिला जात आहे असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय. तर शुद्ध अंत:करणाने येणारे आणि कच न खाता निवडणुकीला सामोरे जाणा-यांनाच शिवसेनेत प्रवेश दिला जात आहे असं शिवसेना नेत्या निलम गो-हे यांनी स्पष्ट केलंय. 

Aug 22, 2014, 08:07 PM IST

विधानसभा निवडणुकीआधी वातावरण तापले, काँग्रेस-सेनेत हलचल

घोटाळेबाज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला खाली खेचा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोटीमध्ये केलंय. तर छगन भुजबळ यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केलेय. नवी मुंबईत काँग्रेसचे पदाधिकारी सेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.

Aug 20, 2014, 10:47 PM IST

अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक चिखलीकर शिवसेनेत

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक असलेल्या प्रताप चिखलीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवबंधन धागा बांधून चिखलीकर शिवसेनेत आल्याची अधिकृत घोषणा केली. 

Aug 19, 2014, 10:11 PM IST

राम पंडागळे शिवसेनेत, राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राम पंडागळे यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले.

Aug 14, 2014, 07:41 AM IST

राज्यात आमची सत्ता आणणार - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणारच, असा निर्धार पुन्हा एकदा शिवसैनिकांनी केलाय. मार्मिकच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात त्यादृष्टीनंच शिवसैनिकांनी मोर्चेबांधणी केली.

Aug 14, 2014, 07:32 AM IST

शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा 'पोल-खोल' मेळावा

शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा 'पोल-खोल' मेळावा

Aug 13, 2014, 11:24 AM IST