shiv sena

युतीबाबत दिल्लीत भाजपची बोलणी अधुरी

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतल्या निवास्थानी महाराष्ट्र राज्यातल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं उद्या पुन्हा भाजप नेत्यांची मुंबईत बैठक घेण्यात येणार आहे. 

Sep 16, 2014, 10:32 PM IST

शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी?, 19 ला सर्व पदाधिका-यांची बैठक

शिवसेनेचे स्वबळावर लढण्याच्या तयारीचे संकेत दिलेत. त्यासाठी 19 सप्टेंबरला राज्यातील सर्व पदाधिका-यांची महत्त्वाची बैठक होत आहे. तर जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी भाजपची उद्य़ा मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे. 

Sep 16, 2014, 07:41 PM IST

शिवसेना-भाजप युतीत तणाव, जागा वाटपासाठी अमित शाह मुंबईत

शिवसेना-भाजपमध्ये युतीवरुन तणाव वाढलाय. किती कोणाला जागा द्यायच्या यावर एकमत होत नाही. भाजप नेते जाहीररित्या जागांबाबत भाष्य करीत असल्याने शिवसेनेच्या गोठात प्रचंड नाराजी आहे.  

Sep 16, 2014, 06:04 PM IST

भाजपच्या जास्त जागांचा आग्रह शिवसेनेनं मान्य करावं – पवार

 लोकसभा निवडणुकीचा विधानसभेवर परिणाम होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकांचा प्रचार शुभारंभ आज कोल्हापूर इथल्या गांधी मैदानातून झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. 

Sep 15, 2014, 07:06 PM IST

मुख्यमंत्री आयसीयूमधील पेशंटप्रमाणे अस्थिर - उद्धव ठाकरे

सुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांचं मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनलं असल्याची टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र सोडण्यात आलं असून 'अतिदक्षता विभागातील पेशंट अनेकदा अर्धग्लानीत जाऊन असंबद्ध बरळतो तसं काहीसं राज्याच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांचं झालं असल्याचं' लेखात म्हटलं आहे. 

Sep 15, 2014, 05:11 PM IST

'युती तुटेल असं पाऊल उचलणार नाही' - उद्धव

जागावाटपावरून भाजप आणि शिवसेना युतीत निर्माण झालेल्या तणावावर आपण काहीही नकारात्मक बोलणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. प्रत्येक वेळी जागावाटपावरून अशी स्थिती निर्माण होते की, युती तुटेल की काय?, पण शेवटच्या क्षणी नेहमी सर्व व्यवस्थित होतं. आणि युती अभेद्य राहते, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आह

Sep 15, 2014, 01:14 PM IST