'लव्ह जिहाद'ला उत्तर देणार शिवसेनेचा 'लव्ह त्रिशूळ'!

'लव्ह जिहाद'ला उत्तर देण्यासाठी आता शिवसेना रणांगणात उतरलीय. आता, 'लव्ह जिहाद'ला 'लव्ह त्रिशूळ'मधून उत्तर देण्याचा बेत शिवसेनेनं आखलाय.

Updated: Sep 10, 2014, 01:23 PM IST
'लव्ह जिहाद'ला उत्तर देणार शिवसेनेचा 'लव्ह त्रिशूळ'! title=

बरेली : 'लव्ह जिहाद'ला उत्तर देण्यासाठी आता शिवसेना रणांगणात उतरलीय. आता, 'लव्ह जिहाद'ला 'लव्ह त्रिशूळ'मधून उत्तर देण्याचा बेत शिवसेनेनं आखलाय.

उत्तरप्रदेश 'शिवसेने'चे अध्यक्ष अनिल सिंग यांनी ही माहिती दिलीय. जिथे जिथे 'लव्ह जिहाद'च्या घटना उघडकीस येतील तिथं प्रत्यक्षरित्या 'लव्ह त्रिशूळ'चे कार्यकर्ते उपस्थित होतील. 

'लव्ह त्रिशूळ'ची सुरुवात बरेलीपासून करून संपूर्ण उत्तरप्रदेशात लागू करण्याचे प्रयत्न केले जातील. त्यामुळे, खोट्या नात्यात अडकणाऱ्या हिंदू मुलींची आणि तरुणी त्यामुळे बचावल्या जातील, असं अनिल सिंग यांनी म्हटलंय. 

याच महिन्याच्या सुरुवातीला, राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या शूटर तारा सहदेव ही 'लव्ह जिहाद'ची शिकार ठरल्याचं समोर आलं होतं. 

दरम्यान, 'लव्ह जिहाद' या नावानं राष्ट्रीय स्वयंसेव संघाकडून (आरएसएस) काही पत्रकं लग्न, सण आणि इतर समारंभात वाटले जात आहेत. अल कायदाचा म्होरका अल जवाहिरीनं भारतीय खंडात नवीन जिहादी ग्रुपची स्थापना केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर आरएसएसशी निगडीत अनेक ग्रुप्स 'लव्ह जिहाद'च्या विरोधात उतरल्याचंही समजतंय. 

मात्र,पोलिसांच्या म्हणण्यानुसार 'लव्ह जिहाद' नावाचा कोणताही ग्रुप सध्या कार्यरत असल्याचं आढळलेलं नाही. पण, या संकल्पनेची चर्चा मात्र मध्य भारतात मोठ्या प्रमाणात सुरु झालीय.   
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.