shiv sena

शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याची चिन्हं

शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची चिन्ह पुन्हा दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरून ब्रेकअप झाला होता. आता सत्तेत पुन्हा मंत्रिपदं मिळाल्यावर शिवसेना आणि भाजपचं पॅचअप होईल, अशी अपेक्षा आहे.

Nov 27, 2014, 04:34 PM IST

शिवसेनेसोबत उद्यापासून चर्चा - देवेंद्र फडणवीस

भाजप आणि शिवसेनेने एकत्र यायला हवं, अशी प्रामाणिक इच्छा आहे. शिवसेनेशी सत्तासहभागाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Nov 27, 2014, 03:49 PM IST

शिवसेना-भाजपचा गोंधळ कायम, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम!

मंत्रिमंडळ विस्तार तोंडावर असताना शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही? याबाबत अजून संभ्रम कायम आहे. एकीकडे शिवसेना-भाजपाचे नेते एकमेकांवर टीका करत असताना दुसरीकडे सत्तेत सहभागी होण्याविषयी चर्चा सुरू असल्याची वक्तव्यही केली जातायत.  

Nov 26, 2014, 09:51 PM IST

अरे बापरे! अजित पवारांचा भाजपला इशारा

भाजपानं इतरांना दोष देण्यापेक्षा जनतेची कामं करावीत अन्यथा आम्ही अधिवेशनादरम्यान सरकारविरोधात भूमिका घेऊ, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे. मी काहीही चुकीचं केलं नसून चौकशीत निर्दोष आढळल्यास मला क्लीन चिट द्यावी, नुसते इशारे देत बसू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

Nov 26, 2014, 06:07 PM IST

नाथाभाऊ यापुढे सांभाळून बोलतील ही अपेक्षा : भुजबळ

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांना लेकीला फोन करावा लागतो, म्हणून मोबाईल बिल भरायला पैसे आहेत, पण वीजेचे बिल भरायला पैसे नाहीत, असं वादग्रस्त विधान केलं होतं, या विधानावर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.

Nov 26, 2014, 11:52 AM IST

शिवसेनेचे आमदार माझ्या संपर्कात - सुधीर मुनगंटीवार

शिवसेनेचे आमदार आपल्या संपर्कात आहेत आणि आपल्याला ते समर्थन द्यायलाही तयार आहेत, असा खळबळजनक दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. भाजप दिशाभूल करीत असल्याचे सेनेने म्हटलेय.

Nov 25, 2014, 01:24 PM IST

खडसे म्हणजे भाजपचे अजित पवार, उद्धव ठाकरेंची टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरेंनी खडसेंची तुलना थेट अजित पवारांसोबत करत, खडसे म्हणजे भाजपचे अजित पवार असं म्हटलंय.

Nov 24, 2014, 07:37 PM IST

हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी पक्षच - संजय राऊत

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेऊ, असं भाजपाचे नेते सांगत असले तरी शिवसेना नेत्यांनी भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावत सरकारला धारेवर धरेल असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

Nov 23, 2014, 10:17 PM IST

भाजप-सेनेची बोलणी आता मंत्र्यांच्या शपथविधीवर अडली - सूत्र

शिवसेना-भाजप युतीसंदर्भात बोलणी पुन्हा सुरू झाल्याचं कळतंय. मात्र ही बोलणी आता बोलणी मंत्र्यांच्या शपथविधीवर अडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

Nov 23, 2014, 09:16 PM IST