IND VS ENG T20 : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England ) यांच्यात 5 सामन्यांच्या टी 20 सीरिजला आज पासून सुरुवात होणार आहे. 22 जानेवारी रोजी या सीरिजचा पहिला सामना खेळवला जाणार असून या सामन्यात टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व कर्णधार सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) असणार आहे. तर उपकर्णधारपद हार्दिक पंड्याकडे दिलं जाणार आहे. कोलकाताच्या एडन गार्डन स्टेडियमवर हा सामना पार पडेल. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या कर्णधाराची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उपकर्णधारपदावरून हटवण्यात आलेल्या हार्दिक पंड्याबाबत सूर्याला प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना हार्दिकशी असलेल्या संबंधाबाबत सूर्याने स्पष्टच उत्तर दिले.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया आता इंग्लंडचा सामना करणार आहे. या सामन्यासाठी 11 जानेवारी रोजी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर टीम इंडियाचं कर्णधारपद हे सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले. तर त्याआधीपासूनच हार्दिक पंड्या हा संघाचा उपकर्णधार होता. मात्र इंग्लड विरुद्ध टी 20, वनडे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर केलेल्या भारतीय संघात हार्दिक पंड्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले. इंग्लड विरुद्ध टी 20 सीरिजसाठी अक्षर पटेलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं असून वनडे सीरिज आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभमन गिलवर उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार हेड कोच गौतम गंभीर हा हार्दिक पंड्याला उपकर्णधार बनवण्यासाठी आग्रही होता. परंतु रोहित शर्मा आणि सिलेक्टर कमिटीचे अध्यक्ष अजित आगरकर हे शुभमन गिलला उपकर्णधार बनवण्यासाठी आग्रही होते. अखेर वनडे सीरिज आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा उपकर्णधार म्हणून शुभमनच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
हार्दिकशी तुझं जमत का? असा प्रश्न कर्णधार सूर्यकुमार यादवला पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावेळी सूर्या म्हणाला, "हार्दिक पांड्यासोबतचे नाते खरोखरच चांगले आहे. हार्दिक देखील नेतृत्व गटाचा एक भाग आहे. जेव्हा आपण बसतो तेव्हा संघाला पुढे जाऊन काय करायचे आहे हे आपण ठरवतो आणि मैदानावरही तो नेहमीच सोबत असतो". तेव्हा हार्दिकशी आपले संबंध चांगले आहेत असं सूर्याचं म्हणणं होतं.
Suryakumar Yadav said, "the relationship with Hardik Pandya has been really great. Hardik is also part of the leadership group. When we sit, we decide what we want to do with the team going forward and even on the field, he is always around". pic.twitter.com/tQ1Tcmg2XH
— Mufaddal Vohra (mufaddal_vohra) January 22, 2025
संजू सॅमसन (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जूरेल (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्थी, वॉशिंग्टन सुंदर
22 जानेवारी : पहिला सामना, (इडन गार्डन, कोलकाता)
25 जानेवारी : दुसरा सामना, (एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई)
28 जानेवारी : तिसरा सामना, (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, राजकोट)
31 जानेवारी : चौथा सामना, (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे)
2 फेब्रुवारी : पाचवा सामना, (वानखेडे स्टेडियम, मुंबई)