shiv sena

गंगेत घोडं न्हालं; सेना-भाजपच्या २० नेत्यांनी घेतली शपथ

भाजप-शिवसेना य़ुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज झाला. भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दहा मंत्र्यांनी विधान भवनाच्या प्रांगणात मंत्रीपदाची शपथ घेतली.

Dec 5, 2014, 08:43 AM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू पत्रावर सुनावणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेवरून जो वाद निर्माण झालाय. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात मृत्यू पत्रावर सुनावणी सुरु आहे. 

Dec 5, 2014, 08:27 AM IST

भाजप-शिवसेना युतीचे सरकार, सेना विरोधी बाकावरून सत्तेत

शिवसेना-भाजपमधला तिढा अखेर सुटला असून, महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचे सरकार सत्तेवर येणार आहे. शिवसेनेनं सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय.

Dec 4, 2014, 03:13 PM IST

शिवसेना-भाजपमधील तिढा सुटला, शिवसेनेला १२ मंत्रिपदे

शिवसेना-भाजपमध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे. याबाबतची घोषणा १ वाजता होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेत होईल, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली.

Dec 4, 2014, 12:40 PM IST

भाजपकडून शिवसेनेची बोळवण, ५ मंत्र्यांना शपथ देण्याची तयारी

शिवसेना भाजप युती होण्याचे वृत्त हाती आले असतानाच रात्री उशिरा दोन्ही पक्षांत पुन्हा तिढा वाढल्याचे दिसून आलेय. भाजप शिवसेनेच्या ५ मंत्र्यांना शपथ द्यायला तयार आहे. मात्र, शिवसेनेना १२ मंत्र्यांचा एकाचवेळी शपथविधी करा, यावर ठाम आहे.

Dec 4, 2014, 08:12 AM IST

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार, विस्तार ५ डिसेंबरला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. ५  डिसेंबरला सरकारचा विस्तार होईल. नव्याने एकूण २२ जणांना मंत्रीपदाची शपथ घेणार आहे.

Dec 3, 2014, 03:10 PM IST

भाजपची शिवसेनेला ४ कॅबिनेट, ७ राज्यमंत्रीपदाची ऑफर

भाजपनं शिवसेनेला ४ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्रीपदांची ऑफर दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये चर्चेची आज आणखी एक फेरी होणार आहे. दरम्यान, भाजप-शिवसेनेची चर्चा सकारात्मक सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आज पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे नेते भेटणार आहेत. 

Dec 1, 2014, 01:54 PM IST

चर्चेचं गुऱ्हाळ: सेनेला १०-१२ मंत्रिपदं देण्यास भाजप तयार - सूत्र

शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा चर्चा सुरू झालीय. भाजप शिवसेनेला १०-१२ मंत्रिपदं देण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. काल रात्री उशीरा ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेना नेते अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

Dec 1, 2014, 09:11 AM IST