शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याची चिन्हं

शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची चिन्ह पुन्हा दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरून ब्रेकअप झाला होता. आता सत्तेत पुन्हा मंत्रिपदं मिळाल्यावर शिवसेना आणि भाजपचं पॅचअप होईल, अशी अपेक्षा आहे.

Updated: Nov 27, 2014, 04:34 PM IST
शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याची चिन्हं title=

मुंबई : शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची चिन्ह पुन्हा दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरून ब्रेकअप झाला होता. आता सत्तेत पुन्हा मंत्रिपदं मिळाल्यावर शिवसेना आणि भाजपचं पॅचअप होईल, अशी अपेक्षा आहे.

शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राजभवनावर आज दाखल झाले आहेत. यावेळी मंत्रिपद वाटपावरून स्वत: उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत, त्यामुळे महत्वाची पदं शिवसेनेला मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी बोलणी फिस्कटल्यास शिवसेना-भाजपची फारकत कायम राहणार असल्याचं मत जाणकारांचं आहे.

भाजपाने या आधीच आपलं बहुमत असल्याचं विधानसभेत दाखवलं आहे. आवाजी मतदानाने भाजपने बहुमत सिद्ध केलं आहे. मात्र शिवसेना जवळ आल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारख्या विरोधीपक्षांना दबाव निर्माण करता येणार नाहीय. हा भाजपला फायदा आहे, तर भाजपाबरोबर सत्तेत येऊन शिवसेनेलाही सत्तेची फळं चाखता येणार आहेत, तसेच आमदार फुटीची भीती दूर होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.