shiv sena

बाळासाहेबांचं कार्य प्रेरणादायीच, नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कार्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलं, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.  

Nov 17, 2014, 10:02 AM IST

Update - शरद पवार सपत्निक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दुसरा स्मृतीदिन. बरोबर दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बाळासाहेबांची मृत्यूशी झुंज संपली आणि तमाम महाराष्ट्राच्या काळजात चर्र झालं.. आज शिवाजी पार्कावर येऊन आपल्या या लाडक्या नेत्याप्रती आदरांजली व्यक्त करण्यासाठी लाखो शिवसैनिकांची पाउलं दादरकडे वळणार आहेत.

Nov 17, 2014, 09:39 AM IST

शिवसेना-भाजप एकत्र येण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

‘राजकारणात चर्चेची दारं कधीही बंद होत नसतात,’ असं सूचक विधान करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या काळात भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. असं झालं तर मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात सेनेला स्थान मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

Nov 17, 2014, 09:08 AM IST

शिवसेनाप्रमुखांचा दुसरा स्मृतिदिन, शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्त शिवाजी पार्कमधील त्यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेनेनं शक्तिप्रदर्शन करायचं ठरवलं आहे. विधानसभा निवडणुकीत युतीत ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमिवर भाजप नेते स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करायला येणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

Nov 16, 2014, 03:56 PM IST

भाजप-शिवसेना युतीसाठी आता सरसंघचालकांचे प्रयत्न- सूत्र

सेना-भाजप युतीसाठी आता सरसंघचालक मोहन भागवतांनी प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. युती बाबत शिवसेना आणि मोहन भागवतांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतं. 

Nov 16, 2014, 12:06 PM IST

शिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात

 भाजपच्या बरोबरीनं शिवसेना सत्तेत सहभागी होईल आणि त्यातून कोकणाच्या वाट्याला मंत्रिपद येईल अशी आशा कोकणातल्या इच्छुक आमदारांना होती. मात्र विरोधी बाकावर बसण्याच्या निर्णयानं कोकणातल्या दिग्गज नेत्यांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरलं गेलंय. तसंच शिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात स्थानिक पातळीवरही पहायला मिळतील असं चित्र आहे. 

Nov 13, 2014, 06:16 PM IST