अरे बापरे! अजित पवारांचा भाजपला इशारा

भाजपानं इतरांना दोष देण्यापेक्षा जनतेची कामं करावीत अन्यथा आम्ही अधिवेशनादरम्यान सरकारविरोधात भूमिका घेऊ, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे. मी काहीही चुकीचं केलं नसून चौकशीत निर्दोष आढळल्यास मला क्लीन चिट द्यावी, नुसते इशारे देत बसू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

Updated: Nov 26, 2014, 06:07 PM IST
अरे बापरे! अजित पवारांचा भाजपला इशारा title=

मुंबई: भाजपानं इतरांना दोष देण्यापेक्षा जनतेची कामं करावीत अन्यथा आम्ही अधिवेशनादरम्यान सरकारविरोधात भूमिका घेऊ, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे. मी काहीही चुकीचं केलं नसून चौकशीत निर्दोष आढळल्यास मला क्लीन चिट द्यावी, नुसते इशारे देत बसू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या आरोपप्रत्यारोपांवर भाष्य केलं. कोणाची तुलना कोणाबरोबर केली जाते यामध्ये लोकांना काहीच घेणंदेणं नसतं. 

यापेक्षा शेतकऱ्यांच्या आणि जनहिताची कामं करा, असा चिमटा त्यांनी भाजपा आणि शिवसेनेला काढला आहे. आगामी अधिवेशनात दुष्काळाच्या मुद्द्यावर राज्य सरकारविरोधात आंदोलन करु असं त्यांनी सांगितलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.