मुंबई: शिवसेना-भाजप युतीसंदर्भात बोलणी पुन्हा सुरू झाल्याचं कळतंय. मात्र ही बोलणी आता बोलणी मंत्र्यांच्या शपथविधीवर अडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
शिवसेनेच्या १० मंत्र्यांना एकत्र शपथ देण्याची मागणी शिवसेनेनं केल्याचं कळतंय. मात्र भाजप शिवसेनेच्या ५ मंत्र्यांनाच पहिल्या विस्तारात शपथ देण्यास तयार आहेत. एकूण १० मंत्रीपदांवर शिवसेना-भाजप पुन्हा दोस्ती होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजप आण शिवसेना हे सत्ते शिवाय राहू शकत नाही. त्या मुळे दोन्ही पक्षात तडजोड होवू शकते असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरात केले आहे. राज्याच्या राजकारणात काँग्रेस एकाकी पडली आहे अशी चर्चाही त्यांनी फेटाळून लावली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.