shiv sena

मुंबईतील वाढीचा मालमत्ता कर प्रस्ताव मागे

मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वाढीच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी कडाडू विरोध केल्यानंतर शिवसेनेनं माघार घेतल्याचं दिसतंय.

Jan 7, 2015, 09:39 PM IST

मनसेत दाखल झालेल्या शुभा राऊळ पुन्हा शिवसेनेत

 मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ या पुन्हा शिवसेनेत परतल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेमध्ये प्रवेश केला होता.

Jan 7, 2015, 04:42 PM IST

शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा मंत्रिपदावरुन जुंपणार

शिवसेना भाजपातील अखेरच्या मंत्रीपद वाटपावरूनही दोन्ही पक्षातील कुरबूर सुरुच राहणार असं चित्र निर्माण झालंय. शिवसेनेनं आणखी एका कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय. 

Jan 6, 2015, 04:40 PM IST

‘पीके’ला ISIचं फंडिंग, शिवसेनेचा आरोप

PK हा सिनेमा हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे, अशी टीका आधी झाली. मात्र आता PK वर अधिकच गंभीर आरोप होतायत. PK सिनेमाला ISI या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून अर्थपुरवठा झाल्याचा खळबळजनक आरोप केलाय तो शिवसेनेनं.

Jan 5, 2015, 08:18 PM IST

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा सापडली, पण क्रीडा भवनाची?

अखेर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा सापडल्याचं दिसतंय. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक दादरच्या वीर सावरकर मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या क्रीडा भवनाच्या जागेवर उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबई महापालिकेचं हे क्रीडा भवन नादुरूस्त असल्याचं कारण देत दोनच दिवसांपूर्वी बंद करण्यात आलंय. 

Jan 5, 2015, 08:01 PM IST

दुष्काळग्रस्तांच्या मदतीवरून उद्धव ठाकरेंचा सरकारला घरचा आहेर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्याच भाजप-शिवसेना सरकारवर टीकास्त्र सोडलंय. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार कमी पडतंय, असा घरचा आहेर उद्धव ठाकरेंनी दिलाय. 

Jan 5, 2015, 06:41 PM IST