भाजपची शिवसेनेला ४ कॅबिनेट, ७ राज्यमंत्रीपदाची ऑफर

भाजपनं शिवसेनेला ४ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्रीपदांची ऑफर दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये चर्चेची आज आणखी एक फेरी होणार आहे. दरम्यान, भाजप-शिवसेनेची चर्चा सकारात्मक सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आज पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे नेते भेटणार आहेत. 

Updated: Dec 1, 2014, 01:54 PM IST
भाजपची शिवसेनेला ४ कॅबिनेट, ७ राज्यमंत्रीपदाची ऑफर title=

मुंबई: भाजपनं शिवसेनेला ४ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्रीपदांची ऑफर दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये चर्चेची आज आणखी एक फेरी होणार आहे. दरम्यान, भाजप-शिवसेनेची चर्चा सकारात्मक सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आज पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे नेते भेटणार आहेत. 

अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा इरादा फडणवीसांनी कालच जाहीर केलाय. त्यानंतर आता शिवसेनेसोबत पुन्हा युती करण्याच्या प्रयत्नांना वेग आलाय. दरम्यान, जे नेते चर्चेत सहभागी नाहीत त्यांनी न बोललेलंच बरं, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी रामदास कदम यांना टोला लगावलाय. माध्यमांशी बोलताना जे चर्चेत सहभागी आहेत, त्यांनाच बोलू द्यावं अशी विनंतीही त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केलीय. 

दरम्यान, नवीन मंत्री मंडळ विस्तारात शिवसेना दिसेल असा विश्वास भाजप नेते विनोद तावडेंनी व्यक्त केलाय. भाजप-सेना युती संदर्भातला निर्णय येत्या दोन दिवसात शक्य असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.