मुंबईत साडीवाटप करताना कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले

संध्या दोशी यांच्या कार्यकर्त्यांना मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले आहे

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 13, 2017, 02:19 PM IST
मुंबईत साडीवाटप करताना कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले title=

मुंबई : शिवसेनेच्या उमेदवारावर साडीवाटप करण्याचे आरोप होत आहेत, संध्या दोशी यांच्या कार्यकर्त्यांना मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी मुद्देमाल घटनास्थळाहून हस्तगत केला. यावरून चारकोप पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत.

अंधेरीतील चारकोप सेक्टर ३ मधील वॉर्ड क्रमांक १८ च्या उमेदवार, शिवसेनेच्या उमेदवार संध्या दोशी यांच्यावर साडीवाटपाचा आरोप होतोय.

निवडणूक जिंकण्यासाठी आता उमेदवार आचारसंहिता धाब्यावर बसवू लागले आहेत. मुंबईतल्या चारकोप सेक्टर तीनमधल्या वॉर्ड नंबर 18 च्या शिवसेनेच्या उमेदवारांचे कार्यकर्ते, मतदारांना खुलेआम साडीवाटप करताना रंगेहात पकडल्या गेल्या.