भाजपने देशाला बिनपाण्याची आंघोळ घातली : उद्धव ठाकरे

शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. संसदेत मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर टीका केली होती. हाच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढला. काल मोदींनी मनमोहन सिंग यांनी रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला प्राप्त झाली असं म्हणाले. ते रेनकोट घालून आंघोळ तरी करतात मात्र तुम्ही तर देशाला बिनपाण्याची आंघोळ घातली. केवळ साबणाचे बुडबुडे काढलेत. कारण ते पारदर्शक असतात.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 9, 2017, 09:19 PM IST
भाजपने देशाला बिनपाण्याची आंघोळ घातली : उद्धव ठाकरे  title=

मुंबई : शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. संसदेत मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर टीका केली होती. हाच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढला. काल मोदींनी मनमोहन सिंग यांनी रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला प्राप्त झाली असं म्हणाले. ते रेनकोट घालून आंघोळ तरी करतात मात्र तुम्ही तर देशाला बिनपाण्याची आंघोळ घातली. केवळ साबणाचे बुडबुडे काढलेत. कारण ते पारदर्शक असतात.  

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट बोलले की देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ६५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, सगळं कसं पारदर्शक, खरं बोलून गेलेत. काल एक शेतकरी ८ तासात बँकेच्या रांगेत उभा होता. भोवळ येऊन पडला, रूग्णालयात नेईपर्यंत त्याने प्राण सोडले होते. इथे शेतकरी मुळासकट उखडून मरतोय, असे सांगत मुख्यमंत्री गोडबोले असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री तिळगूळ न घेता गोड बोलतात. त्याचवेळी भाजपला टोला हाणला. युती तोडली नसती तर पप्पू कलानीसोबत माझा फोटो झळकला असता, मला ही निवडणूक महापालिका निवडणुकीपुरता मर्यादीत ठेवण्याची इच्छा होती, असे उद्धव म्हणालेत.

भाषणातील ठळक मुद्दे :

- मुंबईभरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात 26 जानेवारीनंतर भगवं चैतन्य पसरलं आहे
- युती तोडली आणि सुटलो असं वाटलं
- उल्हासनगरच्या भाजपच्या बॅनर पाहून सुटलो असं वाटलं. युती तोडली नसती तर कलानी, मोदी आणि शाह सोबत माझा ही फोटो लागला असता
- युती का तोडली? परिवर्तन तर होणारच असे सगळीकडे पोस्टर पाहतोय.
- साधू संत, अडवाणी बाजूला गेले आणि कलानी स्टेजवर दिसायला लागले. गळा आवळणारे हात दिसायला लागले
- मोदी म्हणाले मनमोहन सिंह रेनकोट घालून आंघोळ करतात पण तुम्ही बिन पाण्याची सगळ्या देशाला आंघोळ घालतायत
- हे साबणाच्या पाण्याचे बुडबुडे सोडतायत, बुडबुडे पारदर्शक असतात म्हणून म्हटलं
- नोटेच्या रांगेत शेतकरी बळी पडला, शिवरायांचे आशीर्वाद, आता कमळ फुलणारच
- काही झालं तरी मुख्यमंत्री बरा असावा, तिळगुळ न घेता गोड गोड बोलतो
- मुंबईची तुलना पटण्याशी करता, लाज नाही वाटत, शरम नाही वाटत?
- यांचे दात घशात गेले तरी म्हणतात दात आहेत. यांचे दात ही पारदर्शी आहेत वाटतं
- मुख्यमंत्री म्हणतात सल्लागार बरोबर नाहीत म्हणून यांचा  इंग्रजी अहवाल माझे सहकारी अनिल परब वाचून दाखवतील
- ज्या नागपुरातून आपले मुख्यमंत्री आले त्या नागपूरचा या अहवालात उल्लेख ही नाही. पाटनाचा उल्लेख आहे पण माझ्या उप राजधानीचा उल्लेख नाही
- इथे मुख्यमंत्री महापौर होते, तेव्हा कुठली चौकशी सुरु होती ते ही पारदर्शकपणे समोर येईल
- पटण्याच्या लोकांना विचारतो तुम्हाला राग आला की नाही
- युपीत मतं मागतात आणि इथे पटण्याला नावं ठेवतात, काही निष्ठा ठेवा
- जो मुंबईचा अपमान करेल त्याच्याशी मला नातं ठेवायचं नाही
- मोदींचा फोटो यांच्या जाहीरनाम्यात असता तर लोकांनी विचारलं असतं अच्छे दिन कब आएंगे? म्हणून मोदींचं फिट टाकला नाहीत का?
- स्वतःच्या नेत्यावर निष्ठा नाही तर लोकांची निष्ठा कशी असेल
- भाजपला आव्हान देतो तुम्ही मुंबईसाठी केलेली काम घेऊन समोर या, आम्ही पण येतो, होऊन जाऊ द्या एलदा काय ते समोरासमोर
- आमच्या वचननाम्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचा उल्लेख नाही हे खसपट काढलं
- राजू सरकारच्या अखत्यारीतले विषय महापालिकेच्या वचननाम्यात मी का टाकू?
- मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी कोणाच्या ही प्रचाराला जायला नको पण तुम्ही सगळ्या देशात प्रचार करत फिरताय?
- परदेशात ट्रम्प आल्यापासून धाकधूक झाली... असा माणूस निवडू कसा शकतात असं तिथे म्हंटलं जातंय
- आपल्या देशात म्हणतायत नोटाबंदी झाली ना मग आपण कसा या माणसाला निवडून दिला
- अभिमानाने मी कामं घेऊन आलोय मात्र तुम्ही हे नाकारताय. 
- मुंबई महापालिकेतील ब्लॅक लिस्टेड कॉन्ट्रॅक्टर नागपूर मध्ये मेट्रो आणि रस्त्याची कामं करतायत.
- म्हणजे इथे माफिया आणि तिथे माफ किया? 
- शिवरायांच्या नावाने आम्ही खंडणी मागत नाही, शिवराय आमचे दैवत आहे. 
- तुमच्यासारखे प्रचारापुरता शिवरायांचा फोटो नाही वापरत
- तुम्ही कधी शिवजयंती तरी साजरी केलीत का?
- 25 वर्ष युतीत सडली नसती तर शिवसेना आज राज्य करत असती
- कालपासून मी पिसाळून उठलो आहे
- एकमेकांवर आरोप करताना मुंबईला बदनाम करता?
- शेतकऱ्यांच्या भाजीलाच नव्हे तर नशिबाला किन आला होता तेवढ्यात मोदी बाबांचा मंगळ आढवा आला.
-100 - 125 बळी गेले त्यात एक तरी श्रीमंत होता? होते ते गोर गरीब, बाळंत बायका.
- जवान आत्महत्या करतायत, शेतकरी आत्महत्या करतायत आणि हे म्हणतात सब देश के लिये करता हूॅं, में तो फकीर हूॅं.
- मल्ल्याची संपत्ती जप्त करून हे काय विकायला दुकान थाटून बसणार? 
- आजपर्यंत किती संपत्ती विकल्या गेल्या ते सांगा
- कर्जबुड्यांचं कर्ज फिटवण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या खिशात हात घातलात
- आता देवेंद्र फडणवीस घरातले डब्बे पारदर्शक करणार आहेत. किती पैसे लपवलेत हे बघायला.
- शिवरायांच्या नावाने खंडणी मागण्याचे आरोप करतात आणि पप्पू कलानी सोबत फिरता.
- दाऊदला फरफटत आणणार म्हणायचे पन हे जमायचं नाही.
- एक दिवशी बातमी येईल, दाऊद वार्धयकाने थकून वाट पाहून मेला...
- नाहीतर दाऊद भाजपात प्रवेश करून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग म्हणतील देश का नेता कैसा हो दाऊदाचार्य जैसा हो
- युती तुटल्यापासून सगळे खुश आहेत.
- मुंबईच काय महाराष्ट्रात लोकं पेटून उठलेत... आता माझी सटकली
- मी हत्तीवर अंकुश ठेवणार कारण मागे आंबारात माझी माय बाप जनता आहे. हत्ती जर उधळला तर माझ्या जनतेला त्रास होईल म्हणून मी अंकुश ठेवणारच
- पाच वर्षांनंतर सातू नारायणाच्या पूजेचा तीर्थ प्राशन करायला कोण येतं हे तुम्हाला माहित आहे आणि रक्तदान करायला कोण येतं हे ही तुम्हाला माहित आहे.
- त्यामुळे तिर्थ प्रसादाला जागणार की रक्ताच्या नात्याला जागणार हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला वाट्टेल ते करा...