शिवसेना आमदार आणि शिवसैनिकात वाद, व्हिडिओ क्लीप व्हायरल

 कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्या दोन व्हिडिओ क्लीप वायरल झाल्यायेत. एका क्लीप मध्ये देसाई येथील नाराज शिवसैनिकांशी झालेला वाद आणि एका क्लीप मध्ये गावकरी आणि मनसेच्या उनेदावारांनी आमदार सुभाष भोईर यांना घेराव घातलाय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 9, 2017, 10:37 PM IST
 शिवसेना आमदार आणि शिवसैनिकात वाद, व्हिडिओ क्लीप व्हायरल  title=

कल्याण :  कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्या दोन व्हिडिओ क्लीप वायरल झाल्यायेत. एका क्लीप मध्ये देसाई येथील नाराज शिवसैनिकांशी झालेला वाद आणि एका क्लीप मध्ये गावकरी आणि मनसेच्या उनेदावारांनी आमदार सुभाष भोईर यांना घेराव घातलाय. 

आपल्या पसंतीच्या उमेदावाराला तिकिट न मिळाल्याने ठाणे महापालिकेच्या देसाई गावात नाराज शिवसैनिक शाखाप्रमुख वैकुंठ म्हात्रे आणि त्यांचे इतर साथीदार इतर उमेदवारांचा प्रचार करत होते. यावेळी देसाई गावात आमदार सुभाष भोईर आले आणि त्यांनी काही नाराज शिवसैनिकांना तू इथे का फिरतोय कोणाचा प्रचार करतोय असा जाब विचारला त्यावरुन आमदार सुभाष भोईर यांच्यात आणि शिवसैनिकांमध्ये जोरादार वाद झाला त्याची व्हिडिओ क्लीप बनवण्यात आलीये. 

 

यावेळी स्थानिक ग्रामस्थ संतोष पाटील विरुद्ध आमदार सुभाष भोईर असा शाब्दिक संघर्ष पेटला होता. शेवटी संतोष पाटील आणि इतर मंडळी ऐकत नसल्याने आमदार सुभाष भोईर आपल्या गाडीत बसून निघून गेले. बराच वेळ चाललेल्या वादाची एका स्थानिक ग्रामस्थानेच व्हिडिओ क्लीप बनवून ती वायरल केलीये. 

ज्यामुळे डायघर मध्ये राजकीय वातावरण किती तापलंय याचे चित्र स्पष्ट झालंय. पाहूयात नेमकी आमदार आणि ग्रामस्थांमध्ये काय बातचित झालीय.