प्रसिद्ध बंगाली अभिनेता पियुष गांगुलीचं निधन

बंगाली चित्रपट, टिव्ही आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या पियुष गांगुलीचं निधन झालंय. मागील आठवड्यात झालेल्या भीषण अपघातानंतर त्यांच्यावर सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. 

PTI | Updated: Oct 25, 2015, 12:14 PM IST
प्रसिद्ध बंगाली अभिनेता पियुष गांगुलीचं निधन  title=

कोलकाता: बंगाली चित्रपट, टिव्ही आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या पियुष गांगुलीचं निधन झालंय. मागील आठवड्यात झालेल्या भीषण अपघातानंतर त्यांच्यावर सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. 

गांगुली ५० वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा आहे. आज पहाटे २.४५ वाजता मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालं. 

मागील आठवड्यात मंगळवारी त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. काल अचानक त्यांची प्रकृती अधिक बिघडली. त्यांना व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आलं होतं. 

गांगुली यांच्यासोबतच नृत्यांगणा मलाबिका सेन या सुद्धा त्याच गाडीत होत्या. त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांची प्रकृती सुधारतेय... २० ऑक्टोबरला हावडा जिल्ह्यात कार्यक्रमावरून परतत असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पियुष यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.