नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका करताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले, दहशतवादी ओसामा बिन लादेन याला मारले गेले, त्यावेळी सोनिया रात्रभर रडत होत्या. त्यांना झोपच लागली नाही.
मीडियाच्या रिपोर्टनुसार केंद्रीय मंत्री नक्वी यांनी कम्युनिष्ठ नेत्या वृंदा करात यांच्या ट्विटनंतर हा विधान केलेय. करात यांनी म्हटलेय की, बिहारमध्ये भाजपची हार झाली तर पाकिस्तानात नाहीतर संपूर्ण देशात आनंद साजरा केला जाईल. नक्वी यांनी याबाबत शनिवारी कानपूरमध्ये मीडियाशी बोलताना सांगितले.
साहित्यिकांच्या बंडावरही नक्वी यांनी टीकेची झोड उठवली. मोदी सरकार चांगले काम करत आहे. मात्र, भाजपच्या पारंपरिक विरोधकांनी विस्मृतीत गेलेल्या बुद्धिवाद्यांना पुढे करुन देशात असहिष्णूता वाढल्याचा अपप्रचार सुरु केलाय. देश पाकिस्तानच्या वाटेवर चालल्याची ओरड केली जात आहे. मात्र, पाकिस्तानात मशिदींमध्ये आणि भर रस्त्यावर लोकांना गोळ्या घालून माले जात आहे, देशात असे काही होत नाही, असे नक्वी म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.