कराची : पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याक समुदायावर वाढत्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मानवी अधिकारांचे उल्लंघन करण्यात आल्याने पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कारवाई करण्याचा इशारा द्यावा लागला. तो कोणीही असो. जरी मुस्लिम समुदायातील असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल, शरीफ म्हणालेत.
अधिक वाचा : नवाझ शरीफ यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक हिंदू नागरिकांवर अत्याचार करण्यात येत आहेत. अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मानवी अधिकारांचे उल्लंघन होत असल्याने शरीफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
मी सर्व समुदायांचा पंतप्रधान आहे. हिंदू समुदायावर अत्याचार करणारा मुस्लिम समुदायातील असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शरीफ यांनी म्हटलेय. दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शरीफ यांनी हिंदूच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी पुष्टी जोडली की, पाकिस्तान हा सर्व धर्मियांचा देश असून, मी सर्व धर्मियांचा पंतप्रधान आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.