पाकिस्तानचा हिरवा कंदील, चीनचा अरबी समुद्रात प्रवेश

पाकिस्तान आणि चीनने गुरुवारी अत्यंत महत्त्वकांक्षी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडोरवर शिक्कामोर्तब केलंय. या करारानुसार पाकिस्तानने बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदराच्या परिसरातील सुमारे दोन हजार एकर जमीन ४३ वर्षांसाठी चीनला भाडेतत्वावर दिली आहे. त्यामुळे चीनची अरबी समुद्रातील घुसखोरी वाढणार आहे.

PTI | Updated: Nov 13, 2015, 09:17 AM IST
पाकिस्तानचा हिरवा कंदील, चीनचा अरबी समुद्रात प्रवेश title=

कराची : पाकिस्तान आणि चीनने गुरुवारी अत्यंत महत्त्वकांक्षी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडोरवर शिक्कामोर्तब केलंय. या करारानुसार पाकिस्तानने बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदराच्या परिसरातील सुमारे दोन हजार एकर जमीन ४३ वर्षांसाठी चीनला भाडेतत्वावर दिली आहे. त्यामुळे चीनची अरबी समुद्रातील घुसखोरी वाढणार आहे.

हा प्रकल्प ४.६ कोटी अमेरिकी डॉलर्सचा आहे. या प्रकल्पामुळे चीनसाठी अरबी समुद्रातील प्रवेशासाठी दरवाजे खुले झालेत. या दोन हजार एकर जमिनीच्या उपयोगाचे सर्व हक्क चिनी कंपनीला देण्यात येणार आहेत असं वृत्त चिनी प्रसारमाध्यमांनी दिलंय.

या करारानुसार चीनमधील काशगर शहर अनेक रस्ते आणि पाईपलाईनच्या सहाय्यानं ग्वादर बंदराला जोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प पाक व्याप्त काश्मीरमधून जात असल्यानं भारतानं याला आक्षेप घेतलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.