10

भारतीय वायू सेनेचे विमान बेपत्ता

 भारतीय वायू सेनेचे विमान बेपत्ता झाले आहे. या विमानात २९ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.

आदर्श इमारत ताब्यात घेण्याचे केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्रातील आदर्श इमारत ताब्यात घ्या, असे आदेश आज केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आदर्शमधील रहिवाशांना फ्लॅट खाली करावे लागणार आहेत.

तुर्कस्थानात तीन महिन्याची आणीबाणी जाहीर

लोकशाहीवर आलेलं संकट रोखण्याच्या हेतून तुर्कस्थानात तीन महिन्याची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. 

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक, डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत घोषणा

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

तीन वर्षांपूर्वी बलात्कार झालेल्या मुलीवर त्याच आरोपींकडून पुन्हा बलात्कार

हरियाणामधल्या रोहतकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. तीन वर्षांपूर्वी ज्या आरोपींनी बलात्कार केला, त्याच आरोपींनी पुन्हा त्याच मुलीवर बलात्कार केला . याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

उत्तराखंडसह उत्तरेत पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत

उत्तराखंडसह उत्तरेकडील बहुतांश भागात पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या ४८ तासांत या भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.

फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्यातील बळींची संख्या ८४ वर

फ्रान्सच्या नीस शहरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ८४ नागरिकांचा बळी गेलाय.  तर १००हून अधिक नागरिक जखमी आहेत. 

मध्य प्रदेशात पावसाचा कहर, पुरात ६ जण अडकलेत

मुसळधार पावसानं मध्य प्रदेश राज्याला झोडपून काढले. पावसाचा जबरदस्त तडाखा रेवा जिल्ह्याला बसला आहे. पुराच्या तडाख्यात ६ जण अडखले.

आता बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय नामकरण

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात तीन हायकोर्टाची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आहे आहे. यामध्ये बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. 

बांग्लादेशात ISISचा दहशतवादी हल्ला, २० जणांचा मृत्यू?

भारताचा शेजारी बांग्लादेशमधल्या ढाका येथील डिप्लोमॅटिक क्वॉर्टरच्या हॉटेलला ISISच्या अतिरेक्यांनी टार्गेट केले. या हॉटेलमध्ये ५ ते ९ शस्त्रधारी हल्लेखोर घुसले. त्यांनी अनेकांना ओलीस धरत हल्ला केला. या हल्ल्याच्यावेळी ६० ओलीस पैकी २० जणांचा ठार केल्याचे वृत्त आहे. यात दोन सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे.