फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्यातील बळींची संख्या ८४ वर

फ्रान्सच्या नीस शहरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ८४ नागरिकांचा बळी गेलाय.  तर १००हून अधिक नागरिक जखमी आहेत. 

PTI | Updated: Jul 15, 2016, 07:30 PM IST
फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्यातील बळींची संख्या ८४ वर title=

नीस  : फ्रान्सच्या नीस शहरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ८४ नागरिकांचा बळी गेलाय.  तर १००हून अधिक नागरिक जखमी आहेत. 

दहशतवाद्यानं बेस्टिल शहरात आतषबाजी बघायाला आलेल्या हजारो लोकांच्या गर्दीत एक भरधाव ट्रक घुसवून लोकांना चिरडलं. त्याचप्रमाणे हल्लेखोरानं गर्दीवर गोळीबारही केला. पोलिसांनी तात्काळ दहशतवाद्याला गोळ्या घालून संपवलं. पण तोपर्यंत त्यानं अनेकांचे लोकांचे प्राण घेतले होते. 

हल्ल्यानंतर ट्रकमधून बंदूका आणि हातबॉम्बही जप्त करण्यात आले.  फ्रान्समध्ये गेल्या आठ महिन्यात वारंवार झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये आतापर्यंत १३०जणांचा बळी गेला आहे. काल रात्री झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही आयसीसनं घेतली. पण नोव्हेंबर महिन्यात पॅरिसच्या फुटबॉल स्टेडियमवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. 

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही फ्रान्समधल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स हल्ल्याचा निषेध केला आहे.

दहशतवादी बंदूक आणि बॉम्बस्फोटांव्यतिरिक्त आता इतरही मार्गानं लोकांचे बळी घेत असल्यानं पीडित देशांसमोर नवं आव्हान उभं राहिल्याचं मत भारतीय संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.