10

अमित शाह यांची सुरतमधील सभा उधळून लावली

भाजप अध्यक्ष अमित शाह यांची सभा पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांच्या समर्थकांनी उधळून लावली. गुजरातमध्ये त्यामुळे दे धक्का बसला आहे. गुजरातमध्ये भाजपचे वर्चस्व कमी होत आहे, हे यातून दिसून येत असल्याचे प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

लोकसभा, विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घ्या : राष्ट्रपती

देशात एकाचवेळी लोकसभा आणि राज्यांतील विधानसभा निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर सर्वपक्षांनी विस्तृत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.  

काबूल तीन बॉम्बस्फोटाने हादरले, स्फोटात 24 ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलचा मध्यवर्ती ठिकाणी रात्रीच्या सुमारास तीन बॉम्बस्फोटाने हादरले. आधीच्या दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटात 24 जण ठार झाले होते. तर 91हून अधिक नागरिक जखमी झालेत.

सरकारवर टीका करणे, हा देशद्रोह गुन्हा होत नाही : सर्वोच्च न्यायालय

कोणी सरकारवर टीका केली. तसेच सरकारवर टीका करणाऱ्या कोणावरही देशद्रोह किंवा बदनामीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

कुस्तीपटू योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिक सुवर्णपदक शक्य !

भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तला ऑलिम्पिकचं सुवर्णपदक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तनं कांस्य पदक पटकावलं होतं. 

सिंगापुरात 13 भारतीयांना 'झिका'ची लागण

सिंगापूर शहरात राहणाऱ्या 13 भारतीय नागरिकांना 'झिका' विषाणूची लागण झाली आहे. याबाबतची माहिती भारतीय दुतावासाकडून अधिकृत मिळाली आहे.

बॅड न्यूज, पेट्रोलनंतर अनुदानित सिलिंडर महागला

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक दे धक्का दिलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीपाठोपाठ आता अनुदानित सिलिंडरच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ 2 रुपयांनी करण्यात आली आहे.

महाभियोगानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपती यांची हकालपट्टी

भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या ब्राझीलच्या राष्ट्रपती दिलमा रौस्सेफ यांच्यावर महाभियोग चालविला गेला. त्यानंतर त्याची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

दिल्ली, हैदाराबादमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत

राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्याचवेळी दक्षिणेकडील हैदराबादमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसामुळे दोन्ही ठिकांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महात्मा गांधींची हत्या व्यक्तव्यावरुन राहुल गांधींचे घूमजाव

महात्मा गांधींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केली, असं वक्तव्य करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आता घूमजाव केले आहे.