10

हैदराबादमध्ये मंदिरात मांस ठेवून दंगली घडवण्याचा ISचा डाव

 मंदिरांमध्ये गायी आणि म्हशीचे मांस ठेऊन शहरात दंगली घडवून आणण्याचा इस्लामिक स्टेटचा (आयएस) या दहशतवादी संघटनेचा कुटील डाव होता, अशी माहिती तपासात उघड झालेय.

इस्तांबूल विमानतळावर दोन स्फोट, ३६ ठार तर १४० हून अधिक जखमी

 तुर्कीमधील प्रमुख शहर इस्तांबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटानी हादरुन गेलं. या भीषण स्फोटत आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झालाय तर १४० हून अधिक जण जखमी आहेत. विमानतळाच्या कार पार्किंगमध्ये हे स्फोट घडवण्यात आलेत. तसेच स्फोटानंतर विमानतळातून फायरींगचेही आवाज आले.

ब्रिटनचा युरोपियन युनियनपासून घटस्फोट, डेव्हिड कॅमरून सोडणार पद

चाळीस वर्षांच्या संसारानंतर ब्रिटनचा युरोपियन युनियनपासून घटस्फोट झालाय. ब्रिटीश जनतेच्या निर्णयानं जगभरातल्या बाजारात भूकंप पाहायला मिळालेय. तर सेन्सेक्स १ हजार अंकांनी गडगडला आहे.

NSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनचा खोडा, अमेरिकेचे जोरदार लॉबिंग

NSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनने खोडा घातला आहे. एनपीटीवर सही केल्याशिवाय पाठिंबा देणार नाही, असं सांगत चीनने स्पष्ट नकार दिलाय.

ब्रिटन जनमत चाचणीचा परिणाम शेअर बाजारावर, रुपया घसरला

ब्रिटनच्या नागरिकांनी १९७३ पासून सुरू झालेल्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी जनमत चाचणीच्या निम्म्याहून अधिक मतदारांनी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूनं मतं दिलीत. तर जगभरातील शेअर बाजारावर याचा परिनाम दिसून येत आहे.

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदासाठी यांची नावे चर्चेत, कोण होणार याकडे लक्ष?

नेहमीच भाजप खासदार स्वामी यांच्याकडून टीका होत असल्याने नाराज असलेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी पुढची टर्म स्वीकारण्यास ठाम नकार दिलाय. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा सुरु झालेय. पावसाळी अधिवेशानपूर्वी नव्या गव्हर्रनची निवड करण्यात येणार आहे.

इस्रोची भरारी, एकाचवेळी २० उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक गौरवास्पद कामगिरी केली आहे. तब्बल २० उपग्रह अवकाश पाठवून विक्रम केलाय. 

सातवा वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांना १ ऑगस्टपासून ६ महिन्यांच्या फरकासह वाढीव पगार

सातवा वेतन आयोगाची केंद्र सरकारचे ४७ लाख कर्मचारी आणि ५२ लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी गुडन्यूज आहे. १ ऑगस्टपासून पगार वाढणार असून सहा महिन्यांचा फरकही मिळण्याची शक्यता आहे. 

भाजप आमदार विधानसभेत बाकावर उभा

दिल्ली विधानसभेत भाजप आमदार विजेंद्र गुप्ता चक्क बाकावरच उभे राहिलेत. यामुळे विधानसभेत थोडासा गोंधळ उडाला.

अंजू बॉबी जॉर्जची क्रीडामंत्र्यांविरोधात तक्रार

ऑलिम्पियन अॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज हिनं केरळच्या क्रीडामंत्र्यांविरोधात तक्रार केली आहे. अंजू केरळ स्पोर्ट्स काऊंसिलची अध्यक्ष आहे.