तुर्की : लोकशाहीवर आलेलं संकट रोखण्याच्या हेतून तुर्कस्थानात तीन महिन्याची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
आणीबाणी लागू झाल्यापासून देशभरातून सुमारे ५० हजार लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राजधानी अंकारा शहरात मोठ्या प्रमाणात फौज फाटा लावण्यात आलाय. गेल्याच आठवड्यात लष्करानं केलेला बंडाचा प्रयत्न फसला होता. पण या प्रयत्नात २४६ जणांचा मृत्यू झाला. तर २ हजाराहून अधिक जण जखमी झाले.
सरकारच्या समर्थकांनी या बंडाला दिलेल्या उत्तरात बंडाचा कट रचणारे २४ जणही ठार झालेत. या हिंसाराचानंतर देशातलं वातवारण तणावपूर्ण आहे. त्यावर मात करण्यासाठी आणीबाणी लागू करत असलेल्याचे तय्यीप अर्डगान यांनी जाहीर केले आहे.