10
10
नौदलाच्या स्कॉर्पिन या अत्याधुनिक पाणबुडी प्रकल्पाची गोपनीय माहिती फुटल्याची पुढे आली आहे.
यंदा दहीहंडीची उंची 20 फूटाचीच ठेवा. त्याचबरोबर 18 वर्षांखालील मुलांना सहभागी करुन घेऊ नका, असा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला.
बारामुल्ला सेक्टरमध्ये रात्री अडीचच्या सुमारास दहशतवाद्यांनी सापळा रुचून लष्कराच्या एका गस्तीपथकावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत. तर जम्मू काश्मीर पोलिसांचा एक कर्मचारीसुद्धा या हल्ल्यात ठार झाला.
भारताचा आघाडीचा मल्ल नरसिंग यादव रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची साशंकता अद्याप कायम आहे.
आसाम विधानसभेने आज वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) घटनादुरुस्ती विधेयक सर्वसंमतीने मंजूर झालेय. देशात आसाम हे पहिले राज्य ठरले आहे.
ऑलिम्पिमध्ये भारताच्या महिला बॅडमिंटनपटूंनी वैयक्तिग गटात चांगली सुरुवात केली आहे. सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधू यांनी रिओ स्पर्धेत पहिला विजय संपादन केला आहे.
महिला कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज. प्रसूती रजेचा कालावधी वाढवणारे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना भरपगारी आता ६ महिन्यांची रजा मिळणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
१६ वर्षांपासून उपोषण करणाऱ्या इरोम शर्मिला यांनी आज अखेर उपोषण सोडले. उपोषण सोडल्यानंतर त्या खूप रडल्यात. यावेळी त्या म्हणाल्यात मला मणिपूरची मुख्यमंत्री व्हायचेय. दरम्यान, भाजपकडून त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊ केली आहे.
थायलंडच्या २० वर्षीय वेटलिफ्टरने ५६ किलो वजनी गटात ऑलंम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, अत्यानंद झाल्याने आजीने जल्लोष केला. या आनंदात आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दोघांचा हनीमूनला जाण्याचा बेत ठरला. दोघेही विमानतळावर पोहोचले. मात्र, पतीलाच एकट्याने विमानप्रवास करावा लागला. एकट्यानेच हनीमून कसे करायचे, असा प्रश्न त्याला पडला आणि त्यांने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची मदत मागितली.