10
10
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेले IPLचे सामने १ मे नंतर राज्यात खेळवू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. याविरोधा MCAने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यामुळे एमसीएला मोठा धक्का बसला आहे.
कंडोमच्या पाकिटावरील जे फोटो छापण्यात येतात ते अश्लिलतेसंदर्भातील कायद्याचे उल्लंघन करतात का, यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.
हवामान बदलाबाबत अभ्यास करण्यासंदर्भात पॅरिसमध्ये आज भारतासह १७५ देशांची ऐतिहासिक करार स्वाक्षरी झाली.
उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट रद्द करण्याच्या नैनिताल उच्च न्यायालयाच्या निकालाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेय.
अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात दरड कोसळून १६ मजूर ठार झालेत. तवांगपासून जवळ असलेल्या फामला गावात आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
ओला आणि उबेर यांच्या १८ टॅक्सी दिल्ली सरकारने जप्त केल्यात. ग्राहकांकडून प्रवासाचे अतिरिक्त शुल्क आकारल्यामुळे ही जप्ती केलीय.
पेट्रोल आणि डिझेल किंमती पुन्हा एकदा कपात करण्यात आलेय.
जम्मू-काश्मीरमधील हंडवाडा येथे शाळेतील विद्यार्थींनीची कथित छेडछाड केल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आले. मात्र, कोणत्याही लष्करी जवानाने आपली छेडछाड केलीच नाही. हा जवानांना बदनाम करण्याचा हा कट आहे, असा खुलासा संबंधित विद्यार्थिनीने केलाय.
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरपासून ८५ किमी अंतरावर हंदवारा शहरात निदर्शने करणाऱ्यांना पांगविण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाला. यात होतकरू खेळाडूचा समावेश आहे.
विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. सिलिंडरच्या दरात ४ रूपयांनी घट केली आहे.