10
10
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्याविरोधात केरळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अमेरिकेत लॉस एंजल्समध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाचा कॅम्पस गोळीबाराच्या घटनेनं हादरलाय.
गुजरातमधल्या गुलबर्गा सोसायटीमधील जळीतकांड प्रकरणी विशेष न्यायालयानं २४ आरोपींना दोषी ठरवलंय तर ३६ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमधून (PF) ५o हजार रुपये काढल्यास त्यावर १ जूनपासून मुळातून प्राप्तीकर (टीडीएस) कपात केली जाणार नाही. या निर्णयामुळे ईपीएफओच्या सदस्य असलेल्या कर्मचार्यांना दिलासा मिळणार आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट. नवा घोळ झाल्याने नीट परीक्षा काही राज्यांसाठी एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली.
जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला भागात अतिरेकी दडून बसलेलं घर लष्करानं उडवून दिले. हिज्जबुल मुजाहिद्दीन संघटनेचे दोन अतिरेकी या घरात दडून बसले होते.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जींनी आज शपथ घेतील. सलग दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यात.
देशात डॉक्टरांची कमतरता दिसून येत आहे. अनेक रग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून आता सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्यात आलेय. तशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
पाच राज्यांतमधील निवडणुकीत काँग्रेसने केरळ आणि आसाम गमावले तर केरळ डाव्यांनी आणि आसाम भाजपने आपल्याकडे खेचून आणले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल एकहाती जिंकले. जयललिता यांनी तामिळनाडूत बाजी मारली तर काँग्रेसने पुडुचेरीत यश संपादन केले.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला म्हणावे तसे अच्छे दिन आलेले नाहीत. मात्र, आसाममध्ये काँग्रेसला सत्तेतून खाली खेचत एका राज्यापुरते अच्छे दिन आलेत. हा विजयाचा उत्साह भाजपला नवी ऊर्जा देणारा असेल, असे प्रतिपाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.