10
10
जम्मू-काश्मीर मधील वैष्णोदेवी मंदिराजवळ झालेल्या भूस्खलनात चार भाविकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत.
सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रवाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यांना आळा घालण्याची मागणी होत असते. मात्र, पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. चक्का भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये ७०० कुत्र्यांची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली.
'सार्क' देशांच्या गृहराज्यमंत्री स्तरीय परिषदेसाठी राजनाथ सिंग पाकिस्तानात पोहोचलेत. इस्लामाबादमध्ये उद्या ही परिषद होत आहे.
गेले अनेक महिने देशातील आर्थिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले अत्यंत संवेदनशील वस्तू आणि सेवाकर (जीसटी) विधेयक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेमध्ये मांडले. हे बिल पास करण्यात आले आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सध्या दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी सकाळी सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मंगळवारी वाराणसीमध्ये रॅलीसाठी दाखल झाल्या. रॅलीला सुरुवात झाली. मात्र, अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीला परतावे लागले.
पठाणकोट हल्ल्याप्रकरणी अमेरेकेने भारताला पाकिस्तानाविरोधात ठोस पुरावे सादर केले आहेत. अमेरिकेने NIAला 1हजार पानांचं डोजीयर दिले आहे.
पावसाचा देशभरात कहर पहायाला मिळतोय. आसामध्ये पूरानं कहर माजलाय. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. पुरामध्ये आतापर्यंत २६हून अधिक जणांचा बळी गेल्याची माहिती मिळत आहे. तर ३६ लाख लोक बेघर झाले आहेत. दरम्यान, केंद्राकडून सहाशे कोटींचा मदत निधी जाहीर केलाय.
इंडोनेशियामध्ये चार ड्रग्ज माफियांना थेट गोळ्या मारुन मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे.
काबूल येथे भारतीय महिलेचे अपहरण करण्यात आले होते. या भारतीय महिलेची सुटका करण्यात आली आहे.