तीन वर्षांपूर्वी बलात्कार झालेल्या मुलीवर त्याच आरोपींकडून पुन्हा बलात्कार

हरियाणामधल्या रोहतकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. तीन वर्षांपूर्वी ज्या आरोपींनी बलात्कार केला, त्याच आरोपींनी पुन्हा त्याच मुलीवर बलात्कार केला . याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

PTI | Updated: Jul 19, 2016, 01:52 PM IST
तीन वर्षांपूर्वी बलात्कार झालेल्या मुलीवर त्याच आरोपींकडून पुन्हा बलात्कार title=

चंदीगढ : हरियाणामधल्या रोहतकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. तीन वर्षांपूर्वी ज्या आरोपींनी बलात्कार केला, त्याच आरोपींनी पुन्हा त्याच मुलीवर बलात्कार केला . याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दोन दिवसांपूर्वी एक २० वर्षाची मुलगी रस्त्याच्या बाजुला जखमी अवस्थेत आढळली होती. तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र संतापजनक बाब म्हणजे याच मुलीवर तीन वर्षांपूर्वी बलात्कार झाला होता. त्यावेळी आरोपी असलेल्या ५ जणांनीच तिच्यावर पुन्हा बलात्कार केला असावा, अशी शक्यता आता व्यक्त होत आहे.

या घटनेने संतापाची लाट उसळली असून दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी महिला हक्क कार्यकर्त्यांनी केली आहे. तिच्यावर तीन वर्षांपूर्वी बलात्कार करणारे पाचही आरोपी जामीनावर मुक्त होते. आरोपींना मोकळं सोडल्याची शिक्षा पुन्हा एकदा या महिलेलाच भोगावी लागली असल्याची चर्चा आहे.