10
10
काश्मीरमध्ये शोफिया भागात लष्कर आणि CRPFनं मोठी शोध मोहीम हाती घेतली आहे. या भागात दडून बसलेले अतिरेकी लष्करी जवानांवर सातत्यानं हल्ले करत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ही कारवाई हाती घेण्यात आली आहे.
देशाच्या नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या शरीरावर परिपूर्ण अधिकार नाही, असं देशाचे अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे.
जेट एअरवेजच्या वैमानिकांने एका भारतीय दिव्यांग महिलेला वर्णभेदी शेरेबाजी करून गैरवर्तणूक केल्याने भारतीय क्रिकेटपटू हरभजनसिंग चांगला संतापला आहे. दरम्यान, हरभजनच्या ट्विटनंतर परदेशी पायलटला निलंबित करण्यात आला आहे.
दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवलाय. दिल्ली महापालिकेतील सत्ता भाजपने कायम राखत विजयाची हॅट्रिक केली आहे. मात्र विजयाचा जल्लोष करणार नाही. हा विजय सुकमातील शहीद जवानांना समर्पित करण्यात आल्याचे भाजप जाहीर केलेय.
येथील महानगरपालिका निवडणुकांच्या बुधवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये पुन्हा भाजपने आपली सत्ता काबीज केली आहे. याआधी भाजपची सत्ता होती. ही सत्ता भाजपने पुन्हा राखली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत आम आदमीने भाजपला सुपडा साप केला होता. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची होती. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. मात्र, केजरीवाल यांना मोठा धक्का बसलाय.
बनावट पासपोर्ट प्रकरणी डॉन छोटा राजनसह तिघांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिल्ली कोर्टाने सुनावली आहे. त्याचबरोबर त्याला 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाडेकरुंसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. तुम्ही भाड्याच्या घरात राहा आणि कालांतराने त्याच घराचे मालक व्हा, अशी ही नवी योजना आहे.
घटस्फोटीत स्त्रियांना पुरुषाने पोटगीपोटी त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 25 टक्के रक्कम देणे न्याय असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
पॅरिसच्या मध्यवर्ती भागात आयसीसने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय तर दोघेजण जखमी झालेत.
बलात्काराच्या घटनेनंतर पीडित महिलेच्या पोटी जन्माला येणा-या आपत्याबाबत राज्य सरकारची काही कल्याणकारी योजना आहे का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.