नवी दिल्ली : बनावट पासपोर्ट प्रकरणी डॉन छोटा राजनसह तिघांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिल्ली कोर्टाने सुनावली आहे. त्याचबरोबर त्याला 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान, न्यायालयाने बनावट पासपोर्ट दिल्याप्रकरणी बंगळुरु पासपोर्ट कार्यालयातील 3 अधिकाऱ्यांनाही 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
दिल्लीच्या पतियाला हाऊस न्यायालयाने बनावट पासपोर्ट प्रकरणी छोटा राजनसहीत पासपोर्ट ऑफिसमधील तीन अधिकाऱ्यांना सोमवारी दोषी ठरवले होते.
बनावट पासपोर्टप्रकरणी फेब्रुवारी 2016मध्ये न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये छोटा राजनबरोबर बंगळुरु येथील तीन निवृत्त अधिकाऱ्यांची नावे होती.