शोफियामध्ये अतिरेक्यांचे लष्करी जवानांवर हल्ले सुरुच

काश्मीरमध्ये शोफिया भागात लष्कर आणि CRPFनं मोठी शोध मोहीम हाती घेतली आहे. या भागात दडून बसलेले अतिरेकी लष्करी जवानांवर सातत्यानं हल्ले करत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ही कारवाई हाती घेण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 4, 2017, 10:52 PM IST
 शोफियामध्ये अतिरेक्यांचे लष्करी जवानांवर हल्ले सुरुच title=

जम्मू : काश्मीरमध्ये शोफिया भागात लष्कर आणि CRPFनं मोठी शोध मोहीम हाती घेतली आहे. या भागात दडून बसलेले अतिरेकी लष्करी जवानांवर सातत्यानं हल्ले करत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ही कारवाई हाती घेण्यात आली आहे.

चार हजार जवान या मोहीमेत सहभागी आहेत. हेलिकॉप्टर आणि ड्रोनचीही मदत घेतली जातेय. गेल्या दशकभरातलं हे सर्वात मोठं कोम्बिंग ऑपरेशन मानलं जातंय. प्रत्येक घरात जाऊन शोध घेतला जातोय. 

1990च्या दशकानंतर प्रथमच अशा पद्धतीनं तपास केला जात असल्याचं लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं. या कारवाईमध्ये सामान्य नागरिकांचा बळी जाऊ नये, अशी आमची इच्छा असून त्यासाठी पुरेशी काळजी घेत असल्याचं एका अधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.