विजयाचा जल्लोष नाही, सुकमातील शहीद जवानांना विजय समर्पित : भाजप

दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवलाय. दिल्ली महापालिकेतील सत्ता भाजपने कायम राखत विजयाची हॅट्रिक केली आहे. मात्र विजयाचा जल्लोष करणार नाही. हा विजय सुकमातील शहीद जवानांना समर्पित करण्यात आल्याचे भाजप जाहीर केलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 26, 2017, 06:29 PM IST
विजयाचा जल्लोष नाही, सुकमातील शहीद जवानांना विजय समर्पित : भाजप title=

नवी दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवलाय. दिल्ली महापालिकेतील सत्ता भाजपने कायम राखत विजयाची हॅट्रिक केली आहे. मात्र विजयाचा जल्लोष करणार नाही. हा विजय सुकमातील शहीद जवानांना समर्पित करण्यात आल्याचे भाजप जाहीर केलेय.

सोमवार, २४ एप्रिल रोजी छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला झाला. यात २५ जवानांना हौतात्म्य आले. यामुळे दिल्ली महापालिकेतील विजय साजरा न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. दिल्ली महानगरपालिकेतील विजय भाजपने शहीद जवानांना समर्पित केला आहे.

उत्तर, पूर्व आणि दक्षिण दिल्ली महापालिकांमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या तुलनेत भाजपने चांगली कामगिरी केली. पालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलेय. दरम्यान, प्रत्येकाच्या मनात सुकमामधील हल्ल्याचे दु:ख आहे. नक्षलवादी हल्ल्यात २५ जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे पक्षाकडून विजय साजरा करण्यात येणार नाही. आम्ही आमचा विजय शहीद जवानांना समर्पित करतो, असे दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांनी म्हटले आहे.