10
10
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मतदान मशिनवर ठपका ठेवला. ईव्हीएम मशिनचा भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचा आरोप केला. यात आम आदमी, बसपा, समाजवादी पार्टीतील नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन हॅक करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान राष्ट्रवादीने स्विकारले आहे.
भारतीय लष्कराच्या बहादूर जवानांनी पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला आहे. पाकिस्तानी सैन्याचा बदला घेतला. रॉकेट लाँचर्स, रणगाडेभेदी क्षेपणास्त्रांचा मारा करून पाकिस्तानी चौक्या आणि बंकर्स उद्ध्वस्त केलेत.
तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकचे बंडखोर नेते ओ. पनीरसेल्वम यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिम यानं स्पेनच्या राफेल नदालला पराभवाचा धक्का दिलाय. डॉमिनिकनं नदालला 6-4, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभूतकेलंय.
उत्तराखंडमध्ये भूस्खलन झालंय. यात हजारो भावीक अडकलेत. महाराष्ट्रातील सुमारे दीड हजार भाविकांचाही त्यात समावेश आहे.
आर्थिक गैरव्यवहारचा आरोप असलेले कार्ती चिदंबरम काल रात्री लंडनला रवाना झालेत. दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने त्यांच्या घरांवर धाडी घातल्या होत्या.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) रक्कम काढू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. काही कारणांमुळे पीएफ खात्यातील रक्कम काढू घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची आणि अर्जाची पूर्तता केल्यानंतर प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा होण्यासाठी बराच अवधी लोगतो. आता यापुढे ही रक्कम दहा दिवसांमध्ये खात्यात जमा होईल.
देशात लागू असणारी डाळीच्या साठ्यावरच्या मर्यादा हटवण्यात आल्या आहेत. केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटर द्वारे ही माहिती जाहीर केलीय.
माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्तिक यांच्या येथील घरावर सीबीआयने छापा टाकला. चिदंबरम यांच्या एकूण 14 ठिकाणी ही छापेमारी केली.
जगभरातील जवळपास 74 देशांवर सायबर अॅटॅक करण्यात आला आहे. हॅकर्सने रॅनसमवेअरच्या मदतीने जवळपास 50 हजारांहून अधिक संगणाकांवर निशाणा साधला आहे.