10

भारतातील आयटी क्षेत्राला धक्का, अमेरिकेच्या H1B व्हिसात बदल

H1B व्हिसासंदर्भातल्या नव्या अध्यादेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केली आहे. नवा कायदा आणि कडक नियमामुळे भारतीय आयटी कंपन्यांना याचा फटका बसणार आहे.

भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला

भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला चालणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी विरोधात हा खटला चालणार असून त्यांच्यावर कट आखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

ब्रिटनमध्ये मध्यावधी सार्वत्रिक निवडणुका जाहीर

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत देशात मध्यावधी सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या आहेत. 8 जून रोजी ब्रिटनमध्ये मतदान होईल. 

कुलभूषण यांना पाकिस्तानने पुन्हा कायदेशीर मदत नाकारली

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं पुन्हा एकदा कायदेशीर मदत नाकारली आहे. 

'नोटाबंदीचा निर्णय भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर'

नोटाबंदीचा निर्णय दीर्घकालीन भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल असं भाकित जागतिक बँकेनं वर्तवले आहे. 

श्रीनगरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.  या पोटनिवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आघाडीवर आहेत.

नोटाबंदीनंतर 'क्लीन मनी' कारवाई, 9,334 कोटींचे उत्पन्न जप्त

नोटाबंदीच्या निर्णयानंतर नऊ नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या काळात केंद्रीय आयकर विभागानं 9 हजार 334 कोटी रुपयाचं अघोषित उत्पन्न पकडले आहे.

श्रीनगर येथे जवानांवर हात उचलणाऱ्या 'त्या' तरुणांची धरपकड

सीआरपीएफच्या जवानांना मारहाण करणाऱ्या त्या तरुणांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे. 

पीएफ धारकांना ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ

सलग २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ योगदान देणाऱ्या सदस्यांना भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) निवृत्तीच्या वेळी ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ देणार आहे. 

पोटनिवडणुकीत भाजप-काँग्रेस आघाडीवर, आपची मोठी निराशा

दिल्लीत भाजप तर कर्नाटकमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. आठ राज्यांमधील विधानसभेच्या १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणूक मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे.