नवी दिल्ली : जेट एअरवेजच्या वैमानिकांने एका भारतीय दिव्यांग महिलेला वर्णभेदी शेरेबाजी करून गैरवर्तणूक केल्याने भारतीय क्रिकेटपटू हरभजनसिंग चांगला संतापला आहे. दरम्यान, हरभजनच्या ट्विटनंतर परदेशी पायलटला निलंबित करण्यात आला आहे.
So called this Bernd Hoesslin a pilot with @jetairways called my fellow indian(u bloody indian get out of my flight)while he is earning here
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 26, 2017
हरभजन सिंगच्या ट्विटनंतर जेट एअरवेजचा वर्णद्वेषी परदेशी पायलट निलंबित करण्यात आले आहे. भारतीय प्रवासी महिलेवर वर्णद्वेषी शेरेबाजी करून तिला मारहाण केल्याचा तसेच एका अपंग व्यक्तीला धक्काबुक्की केल्याचा आरोप हरभजनने पायलटवर केला होता.
हरभजन सिंग याने ट्विटरवरून जेट एअरवेजवर हल्लाबोल केला आहे. सर्वांना अशा घटनाविरोधात आवाज उचलण्याचे आवाहन केले आहे. जेट एअरवेजच्या ब्रेण्ड होसिलिन यानं भारतीयांचा अपमान केलाय. भारतीय भूमीत कमावत असूनही त्याने विमानात गैरवर्तणूक केलीय. दिव्यांग प्रवाशाशी त्याने गैरवर्तणूक केलीय. तसंच त्याने महिलांचाही अवमान केलाय, अशा घटनांना थारा द्यायला नको. या घटना रोखण्यासाठी सारे एकत्र येऊ या, असे म्हटले होते.