10
10
उत्तर प्रदेशातील बरेली येथे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात २० पेक्षा जास्त प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना मिळणाऱ्या आर्थिक निधीचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने फुटीरतावादी नेत्यांसह अन्य काही ठिकाणी रविवारी पुन्हा छापे घातले. यामध्ये पाकिस्तानी चलनासह अन्य परदेशी चलन हस्तगत करण्यात आल्याची माहिती एनआयएच्या अधिका-यांनी दिली.
काश्मीरच्या बंदीपोराभागात सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्लयात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी ४ दहशतवाद्यांचा खात्मा केलाय.
इस्रो आज जीएसएलव्ही मार्क-3 या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट-19 हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठवण्यात येणार आहे.
इंग्लंडमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ७ ठार तर २० जण जखमी झालेत. १५ दिवसांच्या आत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यान हादरलं आहे. दरम्यान, ३ दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सोने आणि सोन्याच्या दागिण्यांवर ३ टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. तसेच हिऱ्यावरही जीएसटी लागणार आहे.
जम्मू-काश्मीर सतत कसे धगधग राहिल, असा प्रयत्न सातत्याने पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. त्यातच दहशतवादी संघटनाही प्रयत्नशील आहेत. 'लष्कर-ए-तोयबा' आणि 'हिजबूल मुजाहिद्दीन' या संघटना करत आहे. आज NIAने दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर छापे मारले. यावेळी त्यांना लेटरहेड सापडले.
देशात एकच कर प्रणाली असण्याचा मार्ग मोकळा झालाय. १ जुलैपासून जीएसटी लागू करण्याबाबत सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे.
मराठी माणसाचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न साकार झाले आहे. भारतात नाही, तर चक्क आयर्लंडमध्ये. पार सातासमुद्रापलीकडच्या आयर्लंडवर झेंडा रोवणारा हा कोकणी मालवणी माणूस आहे लिओ वराडकर.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पॅरिस पर्यावरण करारातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केलाय. भारत आणि चीनसारख्या देशांना या करारामुळे अवाजवी फायदा होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केलाय.