10

मणिपूरमध्ये काँग्रेस नंबर वन, सत्तेच्या चाव्या नागा पीपल्स फ्रंटकडे

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला पुन्हा यश मिळाले आहे. मात्र, सत्ता स्थापन करण्यासाठी नागा पीपल्स फ्रंट कोणाला पाठिंबा देणार यावरच सगळे गणित अवलंबून आहे.  

देशात मोदी सर्वात लोकप्रिय, जातीय-परिवारवादाचा अंत : अमित शाह

देशातील सर्वात मोठ्या राज्यात भाजपची एकहाती सत्ता आली आहे. याबद्दल प्रथम भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी लोकांचे अभिनंदन केले आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास आणि त्यांच्या कामांचा आहे. देशात स्वातंत्र्यानंतर मोदीच सर्वात लोकप्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे. जातीयवाद आणि परिवारवादाचा अंत या निवडणुकीतून दिसून आल्याचे ते म्हणालेत.

Good News! महिला कर्मचाऱ्यांना २६ आठवड्यांची प्रसूती रजा, विधेयक लोकसभेत मंजूर

केंद्र सरकारने महिलांना गुड न्यूज दिली आहे. महिलांना आता १२ ऐवजी २६ आठवड्यांची प्रसूती रजा मिळणार आहे. 

लखनऊमध्ये दहशतवादी हल्ला, दहशतवादी-पोलिसांत चकमक सुरू

लखनऊमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. अतिरेकीएका घरामध्ये लपून बसला आहे. सैफूल नावाच्या अतिरेक्याचा घरातून गोळीबार सुरु केला आहे 

अमेरिकेत भारतीय उद्योजकाची गोळ्या घालून हत्या

अमेरिकेत आणखी एका भारतीय वंशाच्या उद्योजकाची हत्या करण्यात आली आहे.  

घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला

स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर पुन्हा महागला आहे. विनाअनुदानीत सिलिंडरची किंमत आज रात्री 12 वाजल्यापासून 86 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता गृहिणींना सिलिंडरसाठी अधिक 86 रुपये मोजावे लागणार आहेत.

एटीएममधून रक्कम काढण्यासाठी मोजावे लागणार 150 रुपये

आता तुम्ही एटीएममधून किमान पाच व्यवहार निशुल्क करु शकत होता. आता याला लगाम बसणार आहे. चौथ्या व्यवहारानंतर तुम्हाला 150 रुपये मोजावे लागणार आहेत.

अमेरिकेत भारतीयाची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेमध्ये एका भारतीय तंत्रज्ञाची वर्णद्वेशातून हत्या करण्यात आली.. मुळचा हैदराबादचा असलेल्या श्रीनिवास कुचीभोतला याला 'माझ्या देशातून निघून जा' असं ओरडत एका निवृत्त नौसैनिकानं गोळ्या घातल्या.

1000ची नोट पुन्हा बाजारात येणार नाही : शक्तिकांता दास

देशात पुन्हा एकदा चलन टंचाईचं सावट घोंगावला सुरूवात झाली आहे. त्यामुळे जेवढे पैसे लागतील तेवढेच काढा, असे आवाहन करण्यात आलेय. त्याचवेळी 1000 रुपयांची नोट चलनात पुन्हा येणार नाही, असे वित्त सचिव शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केले तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान केलेत. या दागिन्यांची किंमत 5 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येथ आहे.